जिल्ह्यातील पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:24+5:30

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र पोलिसांजवळ मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. असुरक्षितरित्या ते कर्तव्य बजावत होते. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणली. याची संवेदनशील पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तत्काळ दखल घेऊन सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

Distribute masks and sanitizers to the police in the district | जिल्ह्यातील पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

जिल्ह्यातील पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी घेतली दखल : सुरक्षित राहून कोरोनाशी लढण्याचे निर्देश, सर्वच पोलीस ठाण्यात वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे. मात्र पोलिसांजवळ मास्क व सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. असुरक्षितरित्या ते कर्तव्य बजावत होते. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणली. याची संवेदनशील पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तत्काळ दखल घेऊन सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.
शहर पोलीस ठाण्यातून मास्क व सॅनिटायझर वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थित चार्ली कमांडोंना खुद्द एसपी एम. राज कुमार यांनी मास्क लावून दिला. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असा सूचना केल्या. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्याने स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे. त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करावा व इतरांनाही सांगावे, असे आवाहन एम. राज कुमार यांनी केले आहे.

Web Title: Distribute masks and sanitizers to the police in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.