एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:20+5:30

गुरुवारी दगावलेली ५८ वर्षीय महिला पुसद शहरातील रहिवासी होती. पॉझिटिव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये २७ पुरुष आणि १९ महिला आहेत. सर्वाधिक दहा रुग्ण नेर तालुक्यात आढळले. त्या खालोखाल आठ रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. त्यात लोखंडीपूल येथील एक पुरुष, तेलीपुरातील दोन पुरुष, गोदाम फैलातील एक महिला, शास्त्रीनगरातील एक पुरुष, कुंभारपुरातील एक पुरुष व अन्य भागातील दोन महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आले.

Death of one, 46 positive | एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू, ४६ पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देकोरोना ब्लास्ट : सर्वाधिक १० नेरमध्ये तर यवतमाळात ८ रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा ब्लास्ट झाला आहे. गुरुवारी आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर नव्याने ४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४० मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी २९ मृतक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहे.
गुरुवारी दगावलेली ५८ वर्षीय महिला पुसद शहरातील रहिवासी होती. पॉझिटिव्ह आलेल्या ४६ जणांमध्ये २७ पुरुष आणि १९ महिला आहेत. सर्वाधिक दहा रुग्ण नेर तालुक्यात आढळले. त्या खालोखाल आठ रुग्ण यवतमाळ शहरात आढळले. त्यात लोखंडीपूल येथील एक पुरुष, तेलीपुरातील दोन पुरुष, गोदाम फैलातील एक महिला, शास्त्रीनगरातील एक पुरुष, कुंभारपुरातील एक पुरुष व अन्य भागातील दोन महिला व एक पुरुष पॉझिटिव्ह आले. तसेच दारव्हा येथील एक पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष तसेच तालुक्यातील अर्ली येथील पाच महिला व एक पुरुष, पुसद तालुक्यातील पार्डी येथील एक पुरुष, एक महिला, श्रीरामपूर येथील एक महिला, पुसदच्या राजे ले-आऊटमधील एक महिला, आंबेडकर वार्डातील एक पुरुष, वसंतनगरातील एक पुरुष याशिवाय पुसद शहरातील एक महिला व दोन पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. उमरखेडच्या मरसूळ येथे दोन पुरुष व एक महिला तर ढाणकीत एक पुरुष, एक महिला कोरोनाबाधित झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले.
दरम्यान ८० रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना गुरुवारी सुटी देण्यात आली. तर दोन रुग्णांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. सध्या जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात १२५ जण भरती आहेत.

Web Title: Death of one, 46 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.