दारव्हा शहरातील रस्त्यांची दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:15+5:30

सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना पायदळ चालणे कठीण झाले.

The daylight of the streets of the city of Darva | दारव्हा शहरातील रस्त्यांची दैनावस्था

दारव्हा शहरातील रस्त्यांची दैनावस्था

googlenewsNext
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : नातूवाडी परिसरात बिकट अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरातील जुनी वस्ती असलेल्या नातूवाडी परिसरातील रस्त्याची सततच्या पावसामुळे दुर्दशा झाली. या भागातील नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे कठीण झाले. त्यांनी आता रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सर्वात जुने नगर असलेल्या या भागातील काही ठिकाणी सिमेंट रस्ते झाले. काही ठिकाणी अद्याप रस्ते झाले नाही. सध्या जुने सिमेंट रस्तेही अनेक ठिकाणी फुटलेले आहे. फुटलेले सिमेंट रस्ते व कच्चे रस्ते चिखलमय झाले. त्यामुळे या भागातील मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना पायदळ चालणे कठीण झाले. दुचाकीस्वारांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागतो. वाहन घसरून अपघात होतात. नागरिकांनी दुरुस्तीसाठी अनेकदा मागणी केली. वारंवार तक्रारी दिल्या. मात्र पालिकेकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळले नाही.
आम्ही नियमित कराचा भरणा पालिकेला करत असताना ज्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा या प्रभागातील नागरिकांनी पलिकेला दिला. त्यावर कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: The daylight of the streets of the city of Darva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.