शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा क्रीडांगणाची होणार सुधारणा

By admin | Updated: October 5, 2016 00:46 IST

येथे खेळण्याकरिता उपलब्ध असणाऱ्या शिवाजी स्टेडियम बॅडमिंटन हॉल यासारख्या दुरावस्थेतील क्रीडांगणाची सुधारणा केल्या जाणार आहे.

पालकमंत्र्यांकडून दखल : खेळाडूंना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनामुकेश इंगोले  दारव्हा याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.गेल्या अनेक दिवसांपासूनच्या तक्रारीची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. खेळाडूंना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे लवकरच सुधारणेच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. दारव्हा येथे नव्याने क्रीडा संकुल उभारण्यात आले नाही. त्यामुळे शिवाजी स्टेडियम बचत भवनमधील बॅडमिंटन कोर्ट यासारख्या पूर्वीच्या ठिकाणी खेळाडूंना सराव करावा लागतो. सध्या अस्तित्वात असलेल्या या क्रीडांगणावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु तरीसुद्धा या ठिकाणांची खस्ता हालत आहे. कारण नियमित देखभाल दुरुस्ती केल्या जात नाही. काही वर्षापूर्वी इथे प्रेक्षक गॅलरी, स्टेज दुरुस्ती, प्रसाधनगृह, संरक्षक भिंत आदींसह मैदानाची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थी झाली आहे. स्टेजवरील टाईल्स फुटल्या, कार्यालयासाठी बांधण्यात आलेल्या खोलीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, प्रसाधनगृहामध्ये घाण पसरली आहे. मैदानाचीसुद्धा दुरावस्था आहे. त्याचबरोबर बॅडमिंटन हॉलची काहीशी अशीच अवस्था आहे. कोर्टच्या पाट्या उखडल्या गेल्या, बाजूच्या टाईल्स फुटल्या. या ठिकाणी व्यवस्थित विजेची व्यवस्था नाही. नियमित साफसफाई होत नाही. या कारणांमुळे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत असल्याने क्रीडांगणाविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संदीप गिरी यांनी शिवाजी स्टेडियम व बॅडमिंटन कोर्टची पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत शिवाजी स्टेडियमचे ग्राऊंड लेवलिंग, पुरुष प्रसाधनगृहाची दुरुस्ती, महिला प्रसाधनगृहाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्टेजची दुरुस्ती करण्यात येईल, तर बॅडमिंटन कोर्टवर मॅटची व्यवस्था या इनडोअर गेममध्ये खेळाडूंना पुरेसा प्रकाश मिळावा याकरिता लाईटची व्यवस्था, हॉलमध्ये नवीन टाईल्स बसविणे आदी महत्त्वपूर्ण कामे करण्यात येणार आहे. तालुका क्रीडा समितीकडे २८ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून त्यामधूनच ही कामे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर सुविधा आणि कार्यालय व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता प्रस्ताव द्या, मी पाठपुरावा करतो, अशा सूचनासुद्धा पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे आगामी काळात दारव्ह्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होईल, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.