आर्णी रोडच्या ऑनलाईन जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:31+5:30

लॉटरी सेंटरच्या नावाने दिनेश छेतीलाल झाडे अवैध ऑनलाईन जुगार खेळवत होता. सचिन पत्रिवार, विशाल खरुले, रोशन विनझाडे, सुमीत पोलेवार हे मजूरीने नोकर म्हणून जुगारासाठी मदत करित होते. पोलिसांनी रोख ५३ हजार १३० रुपय जप्त केले. दिनेश झाडे पसार झाला.

Darn on online gambling off Arni Road | आर्णी रोडच्या ऑनलाईन जुगारावर धाड

आर्णी रोडच्या ऑनलाईन जुगारावर धाड

ठळक मुद्दे१५ जणांना अटक : ५३ हजारांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त

आर्णी रोडच्या ऑनलाईन जुगारावर धाड
१५ जणांना अटक : ५३ हजारांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी मार्गावरील लक्ष्मी आर्केड कॉम्प्लेक्समधील फन ऑनलाईन लॉटरी सेंटरमधून १५ आरोपींना अटक केली. एलसीबीने सोमवारी रात्री ही कारवाई केली.
लॉटरी सेंटरच्या नावाने दिनेश छेतीलाल झाडे अवैध ऑनलाईन जुगार खेळवत होता. सचिन पत्रिवार, विशाल खरुले, रोशन विनझाडे, सुमीत पोलेवार हे मजूरीने नोकर म्हणून जुगारासाठी मदत करित होते. पोलिसांनी रोख ५३ हजार १३० रुपय जप्त केले. दिनेश झाडे पसार झाला. जुगार खेळताना ऋषिकेश वानखेडे, किशोर लोखंडे, वैभव ठाकरे, मयूर दोमोडे, श्रेयश गुल्हाने, वैभव चारभाई, अक्षय पारधी, गोकूल चोपडे, विनांत तोडसाम, हर्षल ठाकरे, ऋषिकांत डेहणकर यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, एलसीबीचे प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत जिंदमवार, बंडू डांगे, गजानन धात्रक, गजानन डोंगरे, विशाल भगत, किरण पडघन, किशोर झेंडेकर, जितेंद्र चौधरी, प्रवीण कुथे, मो. जुनेद यांनी केली.

Web Title: Darn on online gambling off Arni Road