शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय, सावधगिरी हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो लोक गावात परतले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : बेरोजगारी वाढली, झटपट कमाईवर जोर, पोलिसांकडून हवी प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. त्यातच बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांंची भर पडली. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. उपजीविका चालविण्यासाठी बेरोजगारांचे पाय आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. त्यांना पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रोखणे अपेक्षित आहे.लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो लोक गावात परतले. त्यामुळे रोजगाराची आणखीच मारामार होताना दिसते. कुटुंब जगवायचे आहे, पण हाताला काम नाही अशा स्थितीत काहींच्या मनात ‘झटपट कमाई’ देणारे गुन्हेगारीचे विचार फिरु लागले. काहींनी या विचारांनुसार अंमलबजावणीही सुरू केली. त्यातूनच गेल्या काही दिवसात प्रॉपर्टी आणि शरीरासंबंधीचे गुन्हे वाढल्याचे दिसून येते. चोरी, घरफोडी, मंगळसूत्र चोरी, वाटमारी, वाहन चोरी, मारहाण या सारखे गुन्हे घडत आहे. बेरोजगारीमुळे वाम मार्गाला लागण्याचे प्रकारही घडण्याची भीती आहे. नागपुरात हा प्रकार उघड झाला. औरंगाबादमध्ये बहीण-भावाचा खून करून दीड किलो सोने लुटले गेले. अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसात अनेक घटना राज्यात घडल्या आहेत.गुन्हा घडल्यानंतर सहसा पोलिसांची भूमिका सुरू होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाढलेल्या या बेरोजगारीच्या संकटात पोलिसांनी ‘गुन्हा घडूच नये’ या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. पोलिसांनी सतर्क राहून व गुन्हेगारांवर वचक निर्माण करून जनतेच्या मनातील वाढत्या गुन्हेगारीची भीती दूर करावी, अशी मागणीही होत आहे.काही भागात रोजगार आहेत, तर कोरोनाच्या भीतीने तेथे मजूर नाहीत आणि गावखेड्यांमध्ये मजूर आहेत तर तेथे रोजगार नाहीत. अशा विसंगत स्थितीमुळे भविष्यात गुन्हेगारी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र पोलिसांनी वेळीच उपाययोजना करून ही संभाव्य वाढती गुन्हेगारी थांबविणे कठीण नाही. त्यासाठी पोलिसांच्या व्यापक नियोजन, उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीची तेवढी गरज आहे.पोलिसांवर अवलंबून राहू नका, स्वत:च स्वत:ची सुरक्षा सांभाळालॉकडाऊनचा परिणाम पुढे किमान वर्ष-दोन वर्षे राहील असा अंदाज आहे. ते पाहता भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने कायम सावध राहणे हाच पर्याय आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांवर अवलंबून न राहता स्वत:च स्वत:ची सुरक्षा करणे, वेळोवेळी खबरदारी घेणे हाच मार्ग स्पष्ट दिसतो आहे. सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे. नागरिकांनी सावध राहून आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत:च्या मालमत्तेचे स्वत:च रक्षण करणे गरजेचे झाले आहे. बँक-ऑनलाईन व्यवहाराची गोपनीयता महत्वाची ठरते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी