शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून कोर्टाचे दोन सत्रात कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी कामकाज करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. न्यायालयाचे काम दोन सत्रात चालणार आहे. सकाळी १० ते १ व दुपारी २.३० ते ५.३० ही वेळ राहणार आहे. प्रत्येक न्यायालयात जास्तीत जास्त १५ केसेस हाताळता येणार आहे. एका सत्रात ५० टक्के न्यायाधीश व इतर कर्मचारी कामकाज करणार आहेत. निकालाच्या जवळ असलेले खटले प्राधान्याने चालविण्याचे निर्देश आहे.

ठळक मुद्देदरदिवशी १५ केसेस । २४ तासपूर्वी माहिती, समन्स-वॉरंट नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे न्यायालयाचे दैनंदिन कामकाज पूर्णत: बंद होते. आता केंद्र व राज्य शासनाच्या दिशानिर्देशावरून मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवार ८ जूनपासून जिल्हा न्यायालय सुरू होत आहे.न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी कामकाज करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. न्यायालयाचे काम दोन सत्रात चालणार आहे. सकाळी १० ते १ व दुपारी २.३० ते ५.३० ही वेळ राहणार आहे. प्रत्येक न्यायालयात जास्तीत जास्त १५ केसेस हाताळता येणार आहे. एका सत्रात ५० टक्के न्यायाधीश व इतर कर्मचारी कामकाज करणार आहेत. निकालाच्या जवळ असलेले खटले प्राधान्याने चालविण्याचे निर्देश आहे. जिथे एकच कोर्ट आहे, त्या ठिकाणी सकाळच्या सत्रात काम होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी संबंधित न्यायाधीशांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकाच वेळी अधिक केसेस घेता येणार नाही. प्रकरण चालविताना पक्षकार गैरहजर असल्यास त्याच्या विरोधात एकतर्फी आदेश देता येणार नाही, तसेच सक्तीचे आदेश काढून आरोपी-साक्षीदार यांना न्यायालयात बोलविता येणार नाही.वकिलांसाठी असलेले बार रुम पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच काम नसताना वकिलांना न्यायालयात प्रवेशाची परवानगी नाही. कोणत्या कोर्टात कोणता खटला कधी लागणार याची माहिती २४ तास अगोदर जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षाला दिली जाणार आहे. अध्यक्षाकडून ही माहिती संबंधित वकील व पक्षकाराला पुरविण्यात येणार आहे.याउपर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन कामकाजात काही बदल करण्याचेही अधिकार दिले आहेत. या संदर्भात प्रमुख न्यायाधीश वरिष्ठांशी सल्लामसलत करून निर्णय घेतील, असे उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेत नमूद केले आहे.ज्युनिअर वकिलांचा होता कौन्सिलकडे आग्रह - अ‍ॅड. देशमुखन्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे ज्युनिअर वकील आर्थिक अडचणीत आले होते. अनेकांनी विविध स्वरूपाचे कर्ज घेतले आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याने समस्या निर्माण झाली होती. त्यामुळेच बार कौन्सिलकडे या वकिलांकडून कोर्टाचे कामकाज सुरू करण्याबाबत मागणी होती. ही मागणी घेऊन बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष घाडगे यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींशी चर्चा केली. त्यानंतर न्यायालये ८ जूनपासून सुरू करण्याचा आदेश आला आहे. मात्र कामकाज कसे चालणार याबाबत बार कौन्सिलला विश्वासात घेण्यात आले नाही, असे महाराष्टÑ-गोवा बार कौन्सिलचे सदस्य व माजी अध्यक्ष अ‍ॅड. आशिष देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय