Coronavirus in Yawatmal; यवतमाळात अखेर कोरोना लॅब सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:19 PM2020-06-03T12:19:18+5:302020-06-03T12:21:02+5:30

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लॅब साकारण्यास शासनाने मंजुरी दिली. १

Corona Lab finally started in Yavatmal | Coronavirus in Yawatmal; यवतमाळात अखेर कोरोना लॅब सुरू

Coronavirus in Yawatmal; यवतमाळात अखेर कोरोना लॅब सुरू

Next
ठळक मुद्दे आर्टीपिसीआर मशीन कार्यान्वित२४ तासात १२५ नमुने तपासणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना लॅब साकारण्यास शासनाने मंजुरी दिली. १५ मेपासून या लॅबच्या निर्मितीसाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला. सिंगापूरवरून आर्टीपीसीआर मशीन हॉपकिन्सच्या माध्यमातून याची खरेदी करण्यात आली. मंगळवारी सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या अखत्यारित या कोरोना लॅबचे उद्घाटन करण्यात आले. २४ तासात १२५ नमुने तपासण्याची क्षमता या लॅबमध्ये आहे. आता कोरोनाच्या चाचणी अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाने मागील आठ दिवसांपूर्वीच सीबीनॅट व ट्रूनॅट या मशीनच्या सहाय्याने कोरोनाचे नमुने तपासणी सुरू केली होती. मात्र या मशीनवर मर्यादित म्हणजे दहा ते १५ नमुने तपासता येत होते. रुग्णसंख्या व जिल्ह्याचा व्याप बघता कोरोना नमुने तपासणीसाठी स्वतंत्र कोरोना लॅब तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. नव्या प्रशासकीय इमारतीत एका प्रशस्त हॉलमध्ये ही लॅब तयार केली आहे. संपूर्ण मशनरी आल्यानंतरही त्यातील काही पार्ट ट्रान्सपोर्टींगदरम्यान डॅमेज झाले होते. त्याची प्रतिपूर्ती करून ही मशीनरी इन्स्टॉल करण्यात आली.
मंगळवारी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सिंग, कोरोना समन्वयक डॉ.मिलिंद कांबळे यांच्या उपस्थितीत सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विवेक गुजर यांच्या उपस्थितीत या लॅबचे लोकार्पण करण्यात आले. या लॅबमध्ये चार तंत्रज्ञ कार्यरत आहे. २४ तासात १२५ नमुने तपासून त्याचा अहवाल मिळणार आहे. लॅब नसल्याने जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे नमुने नागपूर व अकोला येथे तपासणीला पाठवावे लागत होते. यात बराच वेळ जात होता. आता तातडीने नमुने तपासून अहवाल येणार असल्याने प्रशासनालाही उपाययोजना करताना मदत होणार आहे.

सहा तासात मिळणार अहवाल
आर्टीपीसीआर मशीनवर कोरोना संशयितांच्या स्वॅबची तपासणी होणार आहे. सिंगापूर, जर्मनी, यूएसए या देशातील तंत्रज्ञांनी विकसित केलेले हे मशीन गतीमान पद्धतीने काम करणार आहे. सॅम्पल लावल्यानंतर सहा तासात त्याचा रिपोर्ट हाती येणार आहे. ही लॅब २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संशयिताचा नमुना तत्काळ तपासणी करून तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळणार आहे.

Web Title: Corona Lab finally started in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.