शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये दुसऱ्या दिवशीही कोरोना ब्लास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०२ झाली आहे.

ठळक मुद्दे५० अहवाल पॉझिटिव्ह : अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पोहोचली १२९ वर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा ब्लास्ट झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत तब्बल ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे.पुसद शहर व तालुका कोरोनाचे हॉट स्पॉट बनला आहे. गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ५० नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०२ झाली आहे. शुक्रवारी शहरातील नवीन पुसद, महावीरनगर, वसंतनगर, श्रीरामपूर आदी परिसरातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली आहे.प्रशासनाने २८३ नागरिकांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी सोमवारी ६२ स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आले होते. या ६२ पैकी तब्बल ५० जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. ते सर्व पॉझिटिव्ह आले. अद्याप २२१ जणांचे अहवाल अप्राप्त असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली. यानंतर नव्याने गेल्या दोन दिवसात आणखी १८५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांचाही अहवाल अप्राप्त आहे. त्यापैकी काही अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनातकोरोनाचा प्रादुर्भाव आणि बकरी ईदमुळे शहरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुभाष चौक, नगिना चौक, हनुमान वॉर्ड, मस्तान चौक, गढी वॉर्ड, माळीपुरा, बालाजी चौक आदी मार्गाने शुक्रवारी पोलिसांनी पथसंचलन केले. मुस्लीम बांधवांनी बकरी ईद घरीच साजरी करावी, असे आवाहन शहरचे ठाणेदार पांडुरंग फाडे यांनी केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याPoliceपोलिस