शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह चिमुकली ठार

By admin | Updated: November 2, 2016 00:48 IST

गोदनी येथील वाघामायच्या दर्शनासाठी जात असताना शिंगारे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली.

आई व मुलगी गंभीर : गोधनी बायपासवरील हृदयद्रावक घटना यवतमाळ : गोदनी येथील वाघामायच्या दर्शनासाठी जात असताना शिंगारे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. गोदनी बायपास चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला घाटंजी रोडकडून येत असलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात चिमुकलीसह वडीलाचा जागीच मृत्यू झाला. तर मायलेकी गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. अरविंद मनोज शिंगारे (३६) रा. संभाजीनगर, कोमल अरविंद शिंगारे (५) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात शिल्पा अरविंद शिंगारे (२८) आणि मुलगी रोहिणी अरविंद शिंगारे (३) या दोघी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अरविंद हा आपल्या दोन मुली आणि पत्नीसह दुचाकीने (एमएच २९ एक्स १०१७) संभाजीनगर, जयविजय चौक येथून आराध्य दैवत असलेल्या वाघामायच्या दर्शनासाठी जात होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोदनीकडे जाताना बायपासवरच्या चौफुलीवर घाटंजी रोडकडून आर्णी मार्गाकडे जाणाऱ्या फियाट कारने (क्रं. एमपी ०४ सीएच ३७०४) जोरदार धडक दिली. चौफुलीच्या मधोमधच कार दुचाकीवर धडकली. या अपघातात अरविंद आणि कोमलचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर पत्नी शिल्पा व रोहिणी या दोघी गंभीर जखमी आहेत. शिवाय कारचा चालकही जखमी आहे. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. शिल्पा व रोहिणीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. अरविंद हा चंद्रपूर येथील खासगी एक्स-रे क्लिनिकमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीनिमित्त तो घरी आला होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अलका गायकवाड करत आहे. त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहेपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (कार्यालय प्रतिनिधी)