शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 05:00 IST

१५ जुलैला शाळा सुरू करण्याचे आदेश असल्याने या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी १४ जुलै या एकाच दिवसभरात आटोपण्याचे आव्हान आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी तालुकानिहाय नियोजन करण्याचे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याकरिता मंगळवारी तातडीने प्रत्येक तालुक्यातील आठवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा आदींबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेने मागविला.

ठळक मुद्देशाळा उघडणार : तपासणीनंतरच शिक्षक पोहोचणार शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासन निर्देशानुसार, जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा गुरुवारपासून ‘ऑफलाईन’ भरणार आहेत; मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी बुधवारी एकाच दिवसात जिल्ह्यात सर्वच शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करवून घेण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे निर्माण झाले आहे. यासंदर्भात मंगळवारी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्याची सूचना केली आहे; परंतु जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. १५ जुलैला शाळा सुरू करण्याचे आदेश असल्याने या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी १४ जुलै या एकाच दिवसभरात आटोपण्याचे आव्हान आहे. त्यामुळे चाचण्यांसाठी तालुकानिहाय नियोजन करण्याचे आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याकरिता मंगळवारी तातडीने प्रत्येक तालुक्यातील आठवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा आदींबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेने मागविला. यातील किती कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली, याचीही आकडेवारी मागविण्यात आली. आता संबंधित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून १०० टक्के शिक्षकांची टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र एकाच दिवसात हजारो शिक्षकांची कोरोना चाचणी करताना तालुका आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडण्याची शक्यता आहे. 

पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेत संघटनांची बैठक - १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. तर दुसरीकडे प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी उफाळून आल्या आहे. दोन वर्षांपासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती आता ऐरणीवर आणली गेली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कक्षात १५ जुलैलाच तब्बल २२ शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. यात पदोन्नतीसह आगामी काळातील प्राथमिक शाळांच्याही नियोजनावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक