शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुकुटबनमध्ये लाखो रूपयांचा कापूस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे जेसीबीद्वारे कापूस मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर सदर जेसीबी मोकळ्या जागेत ठेवण्यात आली.

ठळक मुद्देजिनिंगमधील घटना : जेसीबीच्या घर्षणाने आग लागल्याचा दावा, घटना संशयाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कमुकूटबन : येथील पाटण-मुकूटबन मार्गावर असलेल्या बालाजी जिनिंगमध्ये ठेवून असलेल्या सीसीआयच्या कापूस गंजीला मंगळवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस जळून खाक झाला. त्यात सीसीआयचे ८० ते ८५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सीसीआयकडून सांगण्यात आले.विशेष म्हणजे, या जिनिंगमध्ये दरवर्षीच कापूस गंजीला आग लागते. त्यामुळे ही आग लागते की, लावली जाते याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याने ही आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुकुटबन येथील बालाजी जिनिंग व वसंत जिनिंगमध्ये आजपर्यंत सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. मात्र वातावरणातील बदलामुळे सध्या खरेदी बंद आहे. बालाजी जिनिंगमध्ये आतापर्यंत ५९ हजार ७६३ क्विंटल २० किलो कापसाची खरेदी झाली, तर वसंत जिनिंगमध्ये २४ हजार २८ क्विंटल ४५ किलो कापसाची खरेदी झाली. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे जेसीबीद्वारे कापूस मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानंतर सदर जेसीबी मोकळ्या जागेत ठेवण्यात आली. मात्र काही वेळातच कापसाच्या गंजीतून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. त्यामुळे धावाधाव सुरू झाली. आग विझविण्यासाठी मजुरांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र सकाळच्या वेळी हवा सुटल्याने आगीचा प्रकोप वाढू नये, यासाठी येथील सिमेंट कंपनीमधील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजता वणी नगरपरिषदेचे अग्नीशमन दलही घटनास्थळी पोहोचले. या दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच, उपकेंद्र संचालक रत्नाकर पोटे हे मारेगावातून मुकूटबनला पोहोचले. घटनेच्यावेळी उपकेंद्र संचालक राठोड हे सुटीवर होते. जिनिंगमधील कामगार व उपस्थितांनी जेसीबी ट्रॅक्टर हे मध्ये उभे असल्याचे सांगितले.सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, ट्रॅक्टरच्या जेसीबीमधून कापूस जमा करताना घर्षण झाल्याने आग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. या आगीसंदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे.रत्नाकर पोटे,सीसीआय केंद्र उपसंचालक

टॅग्स :cottonकापूसfireआग