शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचा गोंधळ

By admin | Updated: November 13, 2016 00:14 IST

यवतमाळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिका सतत बदलत असल्याने या पक्षाचे पदाधिकारी,

नगरपरिषद निवडणूक : कुठे पाठिंबा, कुठे विरोध, कार्यकर्त्यांची मात्र कोंडीयवतमाळ : यवतमाळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिका सतत बदलत असल्याने या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खुद्द उमेदवारसुद्धा संभ्रमात सापडले आहे. कुठे विरोध करावा लागत आहे, तर कुठे मांडीला मांडी लावून बसावे लागत असल्याने या कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.यवतमाळ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपाच्या अभद्र युतीचा उदय झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळाली आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी समर्थित अपक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. या उलट स्थिती नगरपरिषद निवडणुकांमध्ये आहे. वरच्या स्तरावर नेत्यांनी भाजप-सेना युती जाहीर केली असली तरी स्थानिक पातळीवर तसे चित्र नाही. अनेक ठिकाणी सेनेचे कार्यकर्ते कमळाच्या दिशेने धनुष्यबाण रोखलेले दिसत आहे. यवतमाळात नगराध्यक्षपदासाठी भाजपा व शिवसेना एकमेकांच्या विरोधात टक्कर देत आहे. येथे एक तर राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाचा सक्षम उमेदवारच मिळत नव्हता. प्रचंड प्रयत्न केल्यानंतर अखेरच्या क्षणी तो कसाबसा मिळाला. मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली. विधान परिषद व नगराध्यक्ष या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीने माघार घेतल्याने येथे पक्ष बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम अन्य ठिकाणी होताना दिसतो आहे. प्रभागांमध्येसुद्धा भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांना पाडायला निघाले आहे. कारण, युती भंगली आहे. नेत्यांची आपल्या सोयीने होणारी ही मिलीभगत आणि त्यातील उलाढाल हा तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे. या गोंधळामुळे जनतेला कुठे कसे तोंड द्यावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडतो आहे. पूर्ण विरोध किंवा पूर्ण युती नसल्याने या कार्यकर्त्यांना टोकाची भूमिकाही घेता येत नसल्याचे चित्र आहे. एकूणच संभ्रम आणि गोंधळात नगरपरिषदेच्या या निवडणुकांना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामोरे जात आहे. नेत्यांना मात्र कार्यकर्त्यांच्या या अवस्थेची कोणतीच फिकीर नसल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)