शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील भ्रष्टाचारमुक्तीसाठी दिल्लीपर्यंत सायकल रॅली

By admin | Updated: October 5, 2015 02:30 IST

संपूर्ण देश भ्रष्टाचाराने पोखरला आहे. अशा स्थितीत तेलंगणातील कारागृहाने वर्षभरापासून भ्रष्टाचारमुक्ती केली आहे.

तेलंगणाचे कारागृह अधिकारी : यवतमाळ कारागृहाला भेट, अधिकारी व कैद्यांशी संवाद यवतमाळ : संपूर्ण देश भ्रष्टाचाराने पोखरला आहे. अशा स्थितीत तेलंगणातील कारागृहाने वर्षभरापासून भ्रष्टाचारमुक्ती केली आहे. ही भ्रष्टाचारमुक्ती तेलंगणापुरती मर्यादित न ठेवता देशभरात ही मोहीम राबविण्यासाठी तेलंगणातील १२ कारागृह अधिकाऱ्यांनी सायकल रॅली काढली आहे. सायकलने ते संपूर्ण देश पालथा घालणार आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी रविवारी यवतमाळात भेट दिली. शेवटची भेट ते तिहार कारागृहाला देणार आहेत.कारागृहात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे आरोप होतात. मात्र तेलंगना राज्यातील कारागृह भ्रष्टाचारमुक्त झाले आहे. या ठिकाणी कुठलाही गैरप्रकार होत नाही. यासाठी तेलंगना प्रांताने स्वतंत्र टोल फ्री नंबर तक्रारीसाठी जाहीर केला आहे. २४ तासात संबंधितांच्या अडचणी सोडविल्या जातात. तेलंगणाप्रमाणे संपूर्ण देशालाच भ्रष्टाचारमुुक्तीची गरज आहे. याच्या जाणीवजागृतीसाठी व्यापक मोहिमेची आवश्यकता आहे. यामुळे तेलंगणातील १२ कारागृह अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी तेलंगणा ते दिल्ली हा १८०० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला जात आहे. दररोज १०० किमीप्रमाणे १८ दिवस अधिकारी मोहीम राबविणार आहे. यादरम्यान कारागृह आणि गावांना भेटी दिल्या जाणार आहे.भ्रष्टाचार मुळातून नष्ट व्हावा म्हणून ही मंडळी गाव पातळीवर जाणीवजागृती करीत आहे. कारागृहाची पाहणी करीत आहे. रविवारी या चमूने यवतमाळ कारागृहाला भेट दिली. कारागृहातील प्रशासन व्यवस्था आणि कैदी बांधवाची पाहणी केली. या ठिकाणच्या स्वच्छता आणि शिस्तीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. टोल फ्री नंबरचे स्टिकर प्रवेशद्वारावर लावले. या मोहिमेदरम्यान दोन लाख पोस्टर गावोगावी लावले जाणार आहेत. यासोबतच जाणीवजागृती ही मंडळी करीत आहे. मोहिमेतील अधिकारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.या मोहिमेत श्रीनिवास रेड्डी, आर. राजेंद्र, बी. नागाराजू, व्ही. जोसेफ, व्यंकटरम रेड्डी, सुदर्शन रेड्डी, पी. उपेंद्र, जानकी रामुली, पी. हरीश, टी. भास्कराचार्य, एम. ए. बारी यांचा सहभाग आहे. कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारे आणि त्यांच्या चमूने तेलंगणाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. (शहर वार्ताहर)