शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांना नियुक्त्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता ५ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची ही यादी काढली जाईल असा अंदाज आहे. नवे पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची पहिली यादी जारी करण्यात आली होती. परंतु त्यात एकाच ठिकाणी दोन वर्ष पूर्ण न होणे या कारणामुळे जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी बदलच करता आले नव्हते. आता सामान्य बदल्यांच्यावेळी हे बदल होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता संपण्याकडे नजरा : नियंत्रण कक्षातील गर्दी कमी करणार

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी जारी होण्याची पोलीस अधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यात सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांची संख्या अधिक राहणार असल्याचे सांगितले जाते. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता ५ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची ही यादी काढली जाईल असा अंदाज आहे. नवे पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची पहिली यादी जारी करण्यात आली होती. परंतु त्यात एकाच ठिकाणी दोन वर्ष पूर्ण न होणे या कारणामुळे जिल्हाभरातील महत्वाच्या ठिकाणी बदलच करता आले नव्हते. आता सामान्य बदल्यांच्यावेळी हे बदल होण्याची शक्यता आहे. तर काही अधिकाऱ्यांना दोन वर्ष पूर्ण होण्यास अवघे एक-दोन महिने बाकी असल्याने त्यांना आताच हलविले जाण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे. परंतु दुसऱ्या यादीत काही एपीआय आणि बहुतांश फौजदारांचा समावेश राहणार आहे. नियंत्रण कक्षात सुमारे डझनभर पोलीस अधिकारी तैनात आहेत. त्यांना बाहेर काढले जावून विविध पोलीस ठाणे, शाखांमध्ये नेमले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दुसऱ्या यादीत महत्वाच्या ठाण्यांमध्ये खांदेपालट केली जात का याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातही सोईच्या ठिकाणी जाण्यासाठी काही इच्छुकांनी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी केल्याचेही बोलले जाते. पीआय, एपीआय, पीएसआय पैकी कुणाला कुठे नेमणूक मिळते, कोण कुठे वर्णी लावून घेण्यात यशस्वी होताे, हे पाहणे महत्वाचे ठरते. जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, यवतमाळ ग्रामीण या सारखे काही पोलीस ठाणे सध्या सहायक पोलीस निरीक्षकांच्या ताब्यात आहेत. तेथे पोलीस निरीक्षक दिले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Policeपोलिस