शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल दरवाढीविरोधात सेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

शिवसैनिकांनी शुक्रवारी राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दराच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. स्थानिक नेताजी चौकातून निषेध आंदोलनाला प्रारंभ झाला. दत्त चौकापर्यंत आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत धडक दिली. दत्त चौकामध्ये या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड रोष नोंदविला. केंद्र शासन जनतेच्या विरोधात असल्याने येत्या काळात हे सरकार उलथून टाकावे, असे मत यावेळी शिवसैनिकांनी नोंदविले.

ठळक मुद्देघाेडे, बैलगाडीवर बसून केंद्र शासनाविरुद्ध केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जगभरात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र, भारतातच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारून केंद्र शासनाने देशाला नवा हुकूमशाह मिळाला असल्याचा घणाघाती आरोप शिवसैनिकांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान केला. यावेळी बैलगाडीवर दुचाकी ठेवून पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला, तर काही शिवसैनिकांनी घोड्यावर बसून दरवाढीचे फलक उंचावून निषेध नोंदविला. शिवसैनिकांनी शुक्रवारी राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दराच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. स्थानिक नेताजी चौकातून निषेध आंदोलनाला प्रारंभ झाला. दत्त चौकापर्यंत आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत धडक दिली. दत्त चौकामध्ये या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात प्रचंड रोष नोंदविला. केंद्र शासन जनतेच्या विरोधात असल्याने येत्या काळात हे सरकार उलथून टाकावे, असे मत यावेळी शिवसैनिकांनी नोंदविले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, पराग पिंगळे, उमरखेड विधानसभा संपर्कप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, दिग्रस शहर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप रत्नपारखी यांची यावेळी भाषणे झाली. या आंदोलनात ॲड. बळीराम मुटकुळे, सतीश नाईक, विकास जामकर, उत्तम ठवकर, मनोज सिंगी, मनोज नाल्हे, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, राजू राठोड, गिरीश व्यास यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना