शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एका बिबट्याचा मृत्यू

By admin | Updated: January 20, 2015 22:42 IST

तालुक्यातील हातणी शिवारातील माळेगाव पांदण रस्त्यावर मंगळवारी दुपारी बिबट्याचा मृतदेह आढळला. यापूर्वी ११ जानेवारीला ब्रह्मनाथ शिवारात संशयास्पद स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळला होता.

दारव्हा : तालुक्यातील हातणी शिवारातील माळेगाव पांदण रस्त्यावर मंगळवारी दुपारी बिबट्याचा मृतदेह आढळला. यापूर्वी ११ जानेवारीला ब्रह्मनाथ शिवारात संशयास्पद स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळला होता. आठवड्याभरात एकाच परिक्षेत्रात दोन बिबट्याचे मृतदेह आढळल्याने वनविभाग चांगलाच हादरला आहे. ब्रह्मनाथ शिवारातील संशयास्पद स्थितीत आढळलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप उलगडले नाही. याचा तपास सुरू असताना मंगळवारी दुपारी हातणी शिवारातील माळेगाव पांदण रस्त्यावर नर जातीचा बिबट मृत अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. या बिबटाचा तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. एकाच वनपरिक्षेत्रात सलग दोन घटना उघडकीस आल्याने वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील बिबट्याचा मृतदेह कुजन्याच्या प्रक्रियेत आल्यानंतरच त्याची माहिती उघड झाली. या दोन्ही घटनेचे एकमेकाशी सार्धम्य असल्याने वनविभागापुढचे आव्हान वाढले आहे. हातणी व माळेगाव शिवारात ग्रामस्थांनी तीन बिबट पाहिल्याचे सांगितले जाते. यापैकी एक मादी बिबट असून, तिच्या सोबत दोन पिल्ले पाहण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे. या तीन बिबटापैकी दोन बिबटाचा सारख्याच पद्धतीने मृत्यू झाल्याने संशय वाढला आहे. वनविभाग या घटनेचा कसा उलगडा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)