शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका व रेशनच्या धान्यासाठी परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ‘एमपीजे’ची यवतमाळ तहसील कार्यालयावर धडक, दलालांविरूद्ध सुरू केली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिधापत्रिका आणि रेशनवरील धान्यासाठी गरजूंची परवड सुरू आहे. यवतमाळ तहसील कार्यालयात सुरू असलेल्या या प्रकाराविरूद्ध मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअरने धडक दिली. या कार्यालयात सुरू असलेला दलालांचा गोंधळ थांबविण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शैलेश काळे यांना देऊन कारवाईची मागणी केली.अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे. मात्र तहसील कार्यालयात याविषयी योग्य आणि समाधानकारक माहिती दिली जात नाही. खिडकी क्र.८ चा कर्मचारी नवीन शिधापत्रिकेसाठी लागणारा नमूना अर्ज-१ उपलब्ध नसल्याचे सांगतो. बाहेर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये हा अर्ज मिळते अशी सूचना केली जाते. याठिकाणी पाच रुपये मोजावे लागते. वास्तविक नमूना अर्ज-१, ८, ९, १८ हे अर्ज शासकीय कार्यालयातच मिळायला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. शिधापत्रिकेसाठी गरजूंना अत्यंत किचकट आणि नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब एमपीजेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सैयद मोहसीन यांनी तहसील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. नवीन रेशनकार्ड, नूतनीकरण, जीर्ण झालेले रेशन कार्ड, नावे समाविष्ट करणे आदी बाबींसाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एमपीजेचे शहर अध्यक्ष राशेद अनवर, ग्राहक संरक्षक समितीचे जिल्हा प्रमुख प्रशांत कुºहाडकर, शेख जुनैद, अक्रम मवाल, अजित बोरकर, अ. रफिक, शिवा आडे, अतिक शेख, विनोद मिरासे, मो. साजिद, ब्रह्मनंद काळे, मकसूद अली आदी उपस्थित होते.दलालांची कामे लवकरच मार्गी लागतातयवतमाळ तहसील कार्यालयात दलालांची कामे लवकरच होतात. हजार ते १५०० रुपये नागरिकांकडून उकळले जाते. नवीन कार्ड मिळवून देण्यासाठी हा दर दलालांनी निश्चित केला आहे. सामान्य नागरिक दिवसभर रांगेत उभे राहूनही कार्ड मिळत नाही. दलालाच्या माध्यमातून मात्र विनाविलंब कार्ड आणून दिले जाते.