शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

पूस धरणापाठोपाठ इसापूर धरणातही ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम । रबी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जूनपूर्वी पूस आणि इसापूर या दोन्ही मोठ्या धरणांमध्ये जलसाठा अत्यल्प उरला होता. त्यामुळे परिसरातील शेतीसिंचनाचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. मात्री एकीकडे परतीच्या पावसाने खरिपातील पिकांना मोठा फटका दिला असला तरी याच पावसामुळे पूसपाठोपाठ इसापूर धरणातील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे किमान रब्बी हंगामातील पीक घेण्याची शेतकऱ्यांची आशा वाढली आहे.पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. सुरुवातीच्या पावसाने दगा दिल्यामुळे इसापूर धरणाच्या पातळीने निचांक गाठला होता. परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने या धरणात प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने आजमितीस धरणात ५५ टक्के जलसंचय निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीतील पिकाच्या सिंचनासाठी शेतकरी सुखावला आहे. मातीच्या बांधकामातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरण हे महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे प्रमुख धरण असून त्याची संपूर्ण जलाशय पातळी ४४१ मीटर आहे. आजमितीस पाणीपातळी ४३६ मीटर असून यावर्षीच्या कमी पावसाने रब्बीतील पिकांसाठी पाणी मिळणे अवघड असल्याचे वाटत होते. मात्र पावसाळ्याच्या शेवटच्या अंकात पावसाने खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी आशा निर्माण केली आहे.जूनमध्ये होता केवळ मृत जलसाठामागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे इसापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. जेमतेमच भरलेल्या या धरणात जून महिन्यापूर्वी केवळ मृत जलसाठाच शिल्लक राहिला होता. मात्र आता परतीच्या पावसाच्या धडाक्याने इसापूर धरणात ५५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील परिसरातील शेतकºयांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

टॅग्स :Damधरण