सहा महिन्यांत डेंग्यूचे ४१ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:09+5:30

गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्यात आली.

41 dengue patients in six months | सहा महिन्यांत डेंग्यूचे ४१ रूग्ण

सहा महिन्यांत डेंग्यूचे ४१ रूग्ण

ठळक मुद्देसर्वाधिक यवतमाळात : सात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिजोखमीचे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्यात साथरोगाचा फैलाव होतो. यावर्षी जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणाचे काम हाती घेण्यात आले. गत सहा महिन्यात ४१ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने केली. ४१ डेंग्यू रूग्ण आढळलेले ७ प्राथमिक आरोग्य केंद्र अतिजोखीम क्षेत्रात आले आहेत.
गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्यात आली. यामध्ये यवतमाळ १४, दारव्हा ७ , नेर ५, राळेगाव ३, घाटंजी ३, झरी १, कळंब १, दिग्रस १, आर्णी ४, महागाव १ अशा ४१ रूग्णांची नोंद जिल्ह्यामध्ये करण्यात आली.
यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, नेर येथील सात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिजोखीम क्षेत्रात मोडणार आहेत. या आजाराची साखळी तोडता येते. यासारठी अतिजोखीम क्षेत्रात आशासह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

गप्पी मासे पैैैैैैदास केंद्रांचा पर्याय
डासांच्या अळ्या नष्ट करण्याचे काम गप्पी मासे करतात. अलीकडे गप्पी मासे सोडण्यासाठी नागरिकांना ही प्रजाती उपलब्ध होत नाही. यामुळे अडचणी निर्माण होतात. डब्ल्यूसीएलमध्ये असलेल्या खड्ड्यात गप्पी मासे सोडण्याच्या सूचना हिवताप विभागाने दिल्या आहेत. हे मासे डेंग्यूच्या डासांच्या अंड्यांचा नायनाट करतात आणि आजाराची साखळी तोडते.

साथरोग नियंत्रणात मलेरियाचे ५० क्लिनिक उभारण्यात आले आहे. तर डेंग्यूची एलायझा टेस्ट यवतमाळात उपलब्ध आहे. यामुळे उपचार तत्काळ होण्यास मोलाचा हातभार लागत आहे. शहरी भागातील रिकामे प्लॉट, साचलेले पाणी या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. असे भाग तत्काळ स्वच्छ करण्याचे पत्र आरोग्य विभागाने दिले आहे. मात्र या पत्राला नगरपरिषद, ग्रामपंचायत क्षेत्रातून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.

Web Title: 41 dengue patients in six months