शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

कानेडात शस्त्राच्या धाकावर 32 लाखांची तार पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 23:06 IST

८ नोव्हेंबरच्या रात्री हा थरार घडला. मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवून आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथे दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले होते. अगोदर दोन चोरटे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी असलेल्या दोन पहारेकऱ्यांपैकी एकाला चाकू लावला, तर दुसऱ्याला पेचकच लावून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यात सुरू असलेल्या टॉवर लाईनच्या कामावरील पहारेकऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटारूंच्या टोळीने रोख रकमेसह ३२ लाख रुपये किमतीची तार लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील कानेडा परिसरात घडली. विशेष म्हणजे तार चोरीसाठी ट्रक आणि क्रेनचा वापर करण्यात आला. लुटारूंची संख्या १० होती. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.८ नोव्हेंबरच्या रात्री हा थरार घडला. मारेगाव तालुक्यातील कानेडा येथे महाराष्ट्र-तेलंगणा टॉवर लाईनचे साहित्य ठेवून आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ९ ते १० जणांचे एक टोळके कानेडा येथे दोन ट्रक घेऊन गेले. हे ट्रक घटनास्थळापासून लांब उभे करण्यात आले होते. अगोदर दोन चोरटे घटनास्थळी गेले. त्या ठिकाणी असलेल्या दोन पहारेकऱ्यांपैकी एकाला चाकू लावला, तर दुसऱ्याला पेचकच लावून आरडाओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या जवळील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. पहारेकरी दहशतीत आल्याचे लक्षात येताच, लांब उभ्या असलेल्या सहकाऱ्यांना फोन करून दोन्ही ट्रक घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी उभ्या असलेल्या क्रेन मशीनच्या साह्याने या लुटारूंनी टॉवर तारांचे आठ बंडल ट्रकमध्ये टाकले. ९ वा बंडल क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये टाकत असतानाच क्रेनचा केबल तुटला.  त्यामुळे लुटारूंनी पहारेकऱ्यांचे हातपाय बांधून चोरटे घटना स्थळावरून वाहनासह पळून गेले. क्रेन तुटल्याने घटनास्थळी असलेले ११ बंडल तार वाचले. ताराच्या एका बंडलची किंमत चार लाख रुपये आहे. लुटारूंनी ३२ लाखांचे ८ बंडल लंपास केले. पहारेकरी सरीम आलम बाबर अली रा. कुमरगंज, बंगाल. (हल्ली मुक्काम कानेडा) यांनी सकाळी आठ वाजता पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी अज्ञात ९ ते १० लुटारूंच्या विरोधात भादंवी ३९५, ३९७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात चारचाकी वाहनातून येत चोरी करण्याच्या घटना घडत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीThiefचोर