शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षानंतर पुसदला अध्यक्ष पदाचा बहुमान

By admin | Updated: September 22, 2014 23:46 IST

राज्याच्या राजकारणात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या पुसद तालुक्याला १३ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षाचा बहुमान मिळाला आहे. डॉ. आरती फुफाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.

आरती फुफाटे : राष्ट्रवादी काँग्रेसची सरशीपुसद : राज्याच्या राजकारणात आपला अमिट ठसा उमटविणाऱ्या पुसद तालुक्याला १३ वर्षानंतर जिल्हा परिषद अध्यक्षाचा बहुमान मिळाला आहे. डॉ. आरती फुफाटे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. त्यांच्या रूपाने पुसदला सहाव्यांदा अध्यक्षपद मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या जिल्हा परिषदेची स्थापना १९६२ साली झाली. तेव्हापासून ग्रामीण भागातील विकासाला नवी दिशा मिळाली. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान पुसद तालुक्यालाच मिळाला. १९६२ ते १९६७ पर्यंत देवराव पाटील चोंढीकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर पाच वर्षांच्या कालखंडानंतर सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने पुसदकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा आली. १९७२ ते १९७७ असे पाच वर्ष ते अध्यक्ष होते. त्यांचा हा काळ अविस्मरणीय असाच होता. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि हिमाचलचे राज्यपालही झाले. त्यानंतर आठ वर्षाने गोविंदराव पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. ते पुसद तालुक्यातील बेलोरा गटाचे सदस्य होते. १९९२ साली पुन्हा एकदा पुसदच्या वाट्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद अ‍ॅड. नीलय नाईकांच्या रूपाने आले. २००० साली एक वर्षासाठी अनुसयाताई चौधरी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद विभूषित केले. जिल्हा परिषदेच्या ५२ वर्षांच्या कालखंडात पुसद तालुक्याला सहावेळा अध्यक्षपद प्राप्त झाले. डॉ. आरती फुफाटे या बेलोरा गटाचे प्रतिनिधित्व करतात. (तालुका प्रतिनिधी)