शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने बसला सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : परिपक्व शेंगांना फुटले कोंब, दोन लाख हेक्टरवरील पिकांवर निसर्गाची अवकृपा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठी तारांबळ उडविण्यास सुरूवात केली आहे. अपुऱ्या पावसावर मात करणारे बियाणे काही शेतकऱ्यांनी पेरले आहे. असे सोयाबीन काढणीला आले आहे. याच सुमारास परतीचा पाऊस बरसत आहे. यामुळे परिपक्व शेंगांचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. यावर्षी हवामान खात्याने अपुरा पाऊस पडण्याचा अंदाज पेरणीपूर्वी जाहीर केला. याच अंदाजाचा धागा पकडत काही शेतकऱ्यांनी कमी पावसात हातात येणारे सोयाबीनचे वाण पेरले. अर्ली व्हेरायटी म्हणून असे वाण बाजारात प्रसिध्द आहे.प्रारंभी उशिरा आणि अपुरा पाऊस आला. यामुळे पुढे पाऊस बरसणारच नाही. अशा अंदाजात अनेक शेतकºयांनी अर्ली व्हेरायटी शेतशिवारात लावली आहे.हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना निसर्गाकडे साकडे घालण्याशिवाय पर्यायच शिल्लक नाही. शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी निसर्गाला प्रार्थना करीत आहे.काढणी आणि संरक्षण महत्त्वाचेअर्ली व्हेरायटीमधील काढणीला आलेले सोयाबीनचे पीक निरभ्र वातावरणाचा अंदाज घेऊन सोंगावे लागणार आहे. त्याच्या संरक्षणासाठी ताडपत्रीची व्यवस्था करावी लागणार आहे. तर जे पीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे, अशा सोयाबीनच्या शेंगावर सततच्या पावसाने बुरशी पडण्याचा धोका आहे. बिजोत्पादनाचा प्लॉट असणाºया शेतकºयांनी अशा सोयाबीनवर बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामुळे त्यांचा प्लॉट फेल होणार नाही. अशा सोयाबीनची उगवणशक्ती कायम ठेवण्यास मदत होणार आहे.शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊनच अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन काढावे. तर इतर सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने तयारी करावी. त्यावर बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.- प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती