Next

दोन नेते हमरी-तुमरीवर येतात तेव्हा काय होतं बघा... | NCP MLA | Atul Benke Sharad Sonawane | Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:29 PM2022-01-06T16:29:39+5:302022-01-06T16:29:58+5:30

महाविकास आघाडीत बिघाडी, आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात भिडले महाविकास आघाडीतील बिघाडीचा आणखी एक अंक, आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर उतरले. पुण्याच्या जुन्नर परिसरात हा लाजिरवाणा प्रकार घडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांची एकमेकांवर अरेरावी. मुख्यमंत्री सडक योजनेतील कामाचं श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बेनके यांनी या कार्यक्रमाला शिवसेनेला डावलले. मुख्यमंत्र्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेला शिवसेनेला आमंत्रण न देता राष्ट्रवादी श्रेय घेत होती. हे पाहून माजी आमदार सोनवणेंनी त्या कार्यक्रमात बेनकेच्या आधी उपस्थिती लावली. काही वेळाने बेनके आले आणि दोघे जवळच बसले. तेंव्हा सोनवणेंनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत, बेनके यांच्या हाताला स्पर्श करत जाब विचारला. यावरून बेनके अचानक संतापले, मला हात लावायचा नाही म्हणाले. त्यावर मी फक्त स्पर्श केलाय, तुम्ही पटत नाही. तर मग माझ्या बाजूला कशाला बसले. असं सोनवणे म्हणाले. यानंतर हे दोन्ही आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात सर्वांदेखत हमरीतुमरीवर आले...