फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 05:35 PM2024-05-21T17:35:49+5:302024-05-21T17:37:43+5:30

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे.

Fadnavis suddenly stormed Pune's Police Commissionerate; A burst of action in the case of an accident? | फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?

फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?

Devendra Fadnavis ( Marathi News ) : पुणे शहरात रविवारी पहाटे घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. भरधाव कार चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या आरोपीला काही तासांत जामीन मंजूर झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभारावरही आसूड ओढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात जात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत फडणवीस यांनी अपघात प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतल्याचे समजते.

राजकीय दबावातून पुण्यातील अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. याबाबत सोशल मीडियावरून जनक्षोभ उसळल्यानंतर राजकीय नेते आणि प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना फोनवरून दिल्या. त्यानंतर आता गृहमंत्री फडणवीस हे थेट आयुक्तालयात पोहोचले. यावेळी घेतलेल्या बैठकीत फडणवीसांनी  पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी केली असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आरोपीला पाठीशी न घालता योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी कालच फोनवरून दिल्या होत्या. त्यानंतर आजच्या बैठकीत फडणवीस यांच्याकडून पोलिसांना नेमक्या काय सूचना देण्यात आल्या, पुण्यात अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यांवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'त्या' पबबद्दल धक्कादायक माहिती उघड

शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया हे दोघे कल्याणीनगर येथे बॉलर या पबमध्ये गेले होते. हा पब सुमारे सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाला आहे. या पबलादेखील रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी आहे, मात्र तरीदेखील सुरू झाल्यापासूनच हा पब रात्री दोनच्या पुढेच बंद होतो. विशेषत: शनिवारी रात्री तीन-तीन वाजेपर्यंत पब सुरू राहतो. त्यामुळे पब सुरू झाल्यापासून परिसरातील नागरिकांकडून या पबच्या विरोधत अनेक तक्रारी सुरू आहेत. कल्याणीनगरच्या परिसरामध्ये प्रल्हाद भुतडा यांच्या मालकीचा कोजी हा पब आहे. याच पबमध्ये अपघातग्रस्त पोर्सेचा या आलिशान कारचा चालक आला होता. येथील व्यवस्थापक सचिन काटकर यांनी पबमध्ये प्रवेश देताना मुले अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी केलीच नाही. यापूर्वीही ते कधीच करीत नाहीत. सॅटरडे नाईटच्या निमित्ताने सोशल मीडियावर विविध जाहिराती करायच्या, ऑफर्स द्यायच्या आणि हवे तितेके कस्टमर्स पबमध्ये घ्यायचे असा उद्योग राजरोस सुरू असतो. अनेक वेळा तर अगदी शाळकरी मुले-मुलीसुद्दा या पबमध्ये येत जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, पबकडून त्यांच्यावर ना बंदी घातली जात नाही. केवळ पैसे भरा, हातावर त्यांनी दिलेल्या बॅण्ड बांधा आणि रात्रभर नाचा, दारू प्या, हुक्का घ्या असा प्रकार सुरू असतो. 

Web Title: Fadnavis suddenly stormed Pune's Police Commissionerate; A burst of action in the case of an accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.