Next

डिपॉझिट जातं, पक्षही वाढत नाही तरी शिवसेना राज्याबाहेर का लढते? Shiv Sena Outside Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:45 PM2022-01-24T14:45:33+5:302022-01-24T14:45:53+5:30

Shiv Sena News : डिपॉझिट जप्त झालं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और लढेंगे अशी गर्जना शिवसेना खासदार Sanjay Raut यांनी केलीय. विशेषत गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना लढतेय पण ताकद नसताना लढायचंच नाही, फक्त डिपॉझिट जातं म्हणून पक्षच वाढवायचाच नाही असं थोडी असतं असं राऊत म्हणतायत. आता राऊतांच्याच बोलण्यानुसार गेलं तर डिपॉझिट हा मुद्दाच नाही पण बाहेरच्या राज्यात निवडणुका लढून तरी शिवसेना वाढतेय का, महाराष्ट्राबाहेर कोणत्या राज्यात शिवसेनेची भक्कम बांधणी आहे, फक्त निवडणूक लढवली की पक्ष वाढतो असं सेनेच्या धुरिणांना वाटतं का, निवडणुकीनंतर पक्षसंघटनेकडे शिवसेनेनं लक्षं दिलंय का, जशी पक्षबांधणी राष्ट्रवादीची आहे तशी शिवसेनेची का नाही याच मुद्द्यांवर बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात की पक्ष वाढवण्यासाठी राज्याबाहेर शिवसेना लढते हा दावा कितपत खरा आहे ते...