लिंबाच्या झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

By सुनील काकडे | Updated: June 21, 2024 20:41 IST2024-06-21T20:40:55+5:302024-06-21T20:41:11+5:30

याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Youth committed suicide by hanging himself from a tree | लिंबाच्या झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

लिंबाच्या झाडाला गळफास घेवून युवकाची आत्महत्या

सुनील काकडे,वाशिम: खानापूर (ता.कारंजा लाड) येथील अक्षय सुधाकर कडू (३०) या युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, २१ जून रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गावाबाहेर असलेल्या गोठ्याजवळ लिंबाच्या झाडाला अक्षय कडूचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबियांनी ग्रामिण पोलिस स्टेशनला याबाबत माहिती कळविली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात पप्पूवाले करीत आहे.

Web Title: Youth committed suicide by hanging himself from a tree