शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

वाशिम : वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे जाणवत असून, उपचारार्थ सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी हॉस्पिटलमध्येदेखील गर्दी ...

वाशिम : वातावरणातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे जाणवत असून, उपचारार्थ सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी हॉस्पिटलमध्येदेखील गर्दी होत असल्याचे दिसून येते.

गत काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने याचा विपरित परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. वातावरणात गारवा असल्याने सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डोकेदुखी, उलट्या होणे आदी लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुर्तास तरी कोरोनाची तिसरी लाट नसली तरी मुलांना सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे आढळून येत असल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात तसेच खासगी बालरुग्णालयांमध्येही उपचार घेण्यासाठी लहान मुले मोठ्या संख्येने येत असल्याचे दिसून येते.

००००००००००००००००

...ही घ्या काळजी

वातावरणात गारवा असल्याने मुलांना फ्रिजमधील थंड पाणी प्यायला देऊ नये, दूषित पदार्थांचे सेवन टाळावे, स्वच्छता राखावी, भरपूर पाणी प्यावे, अतिथंड पदार्थांचे सेवन टाळावे, पौष्टिक आहार घ्यावा, आजार झालेल्या व्यक्तींशी संपर्क टाळणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

००००००००००००००

कोरोना नाही, डेंग्यू व मलेरियाचे संकट!

मुलांना सर्दी, ताप व खोकला असला तरी तुर्तास तरी कोरोनाची लक्षणे नाहीत. परंतु, मलेरिया व डेंग्यूसदृश लक्षणे आढळून येत असल्याने पालकांनी बालकांची अधिक काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

०००००००००००

रुग्णालयओपीडीदाखल बालरुग्ण

जिल्हा रुग्णालय १२० ४०

कानडे हॉस्पिटल २०० ६०

बाहेती हॉस्पिटल १५० ४०

बाजड हॉस्पिटल १२० २५

परळकर हॉस्पिटल ११० २५

ईश्वरी हॉस्पिटल १०० १५

वानखेडे हॉस्पिटल ७० १०

..................................

कोट

वातावरणातील बदलामुळे सध्या लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. परंतु, घाबरण्याचे काही कारण नाही. व्हायरल फिव्हरची लक्षणे आढळून येताच, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान व उपचार मिळाले तर आजार लवकर नियंत्रणात येऊ शकतो.

- डॉ. प्रवीण वानखेडे

बालरोगतज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम