कारंजा-अमरावती मार्गावर दुचाकीची ऑटोला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:58 AM2021-02-14T11:58:03+5:302021-02-14T11:58:20+5:30

Accident News गोरख राठोड (४५) असे मृतकाचे नाव आहे.

Two-wheeler hits auto on Karanja-Amravati road; One killed | कारंजा-अमरावती मार्गावर दुचाकीची ऑटोला धडक; एक ठार

कारंजा-अमरावती मार्गावर दुचाकीची ऑटोला धडक; एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
कामरगाव :  दुचाकीची प्रवासी ऑटोला मागून धडक बसल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना कारंजा-अमरावती मार्गावरील विळेगाव फाट्यानजीक १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.  गोरख राठोड (४५) असे मृतकाचे नाव आहे.
एम. एच. ३७ झेड ३२०३ क्रमांकाच्या दुचाकीने दोघे जण हे कामरगाव येथील लग्नसोहळा उरकून कारंजाकडे परत येत असताना समोरील प्रवासी ऑटोला दुचाकीची धडक बसली. यामध्ये गोरख राठोड (४५ रा. पिंप्री रामनगर) यांचा मृत्यू झाला, तर गोविंद पवार(४५रा. पिप्री रामनगर)  हे गंभीर जखमी झाले. 
जखमींना उपचाराकरिता कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या या घटनेची नोंद धनज पोलिसांनी घेतली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: Two-wheeler hits auto on Karanja-Amravati road; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.