शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात धावताहेत एकाच क्रमांकाची दोन वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 11:52 IST

Washim RTO News सारख्याच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचे मेसेज संबंधित वाहनाच्या मालकाला पाठविले जातात. यातूनच जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कुठल्याही वाहनाची नोंदणी झाल्यानंतर त्या वाहनाचा क्रमांक निश्चित केला जातो. याची रितसर नोंदणी होते. त्यात एकच क्रमांक कुठल्याही दोन वाहनांना दिला जात नाही. उदा.: एखाद्या दुचाकीस एमएच-३७, ए ३५१५ हा क्रमांक देण्यात आल्यास तो क्रमांक दुसºया दुचाकीस मिळत नाही. तथापि, या क्रमांकाशी साधर्म्य असलेला उदा.: एमएच-३७, सी ३५१५ असा क्रमांक मिळू शकतो.सारखा क्रमांक देताना अक्षरात बदल केला जातो. अर्थात मालिका बदल होते. जिल्ह्यात मात्र सारख्याच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. त्यात १२ सप्टेंबरला एमएच-३७, एस-४९०९ क्रमांकाच्या दुचाकीवर नियम उल्लंघन प्रकरणी पोलिसांनी दंडाची कारवाई केली, तर ३० सप्टेंंबरला याच क्रमाकांच्या दुचाकीवर पुन्हा पोलिसांनी कारवाई केली.त्यात ३० सप्टेंबरला कारवाई झालेल्या दुचाकीचालकाला दंडाचा मेसेज आला. त्यात १२ सप्टेंबरच्या कारवाईचाही मेसेज होता. प्रत्यक्षात त्यांच्या अधिकृत नोंदणी असलेल्या दुचाकीवर एकच कारवाई झाली आहे. या प्रकारामुळेच जिल्ह्यात एकाच क्रमांकाची दोन वाहने धावत असल्याचे सिद्ध होते.

जिल्ह्यात एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी कशा, याचा शोध पोलिसांच्या सहकार्याने घेऊन नेमका काय प्रकार आहेत, तो उजेडात आणून कठोर कारवाई केली जाईल.- एस. व्ही. हिरडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

 

 

 

 

 

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस