शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

३१ डिसेंबरपर्यंतच मिळणार शौचालय बांधकामाचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 16:53 IST

पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या लाभार्थींनादेखील शौचालय बांधकाम केले असल्यास नियमानुसार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थींना शौचालय बांधकामाचे अनुदान ३१ डिसेंबरपूर्वी वितरित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा स्वच्छता मिशनतर्फे ‘अंतिम तपासणी ओडीएफ टप्पा दोन’ची पडताळणी सुरू असून, यासाठी गावपातळीवर तीन जणांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत  (ग्रामीण) ग्रामीण भागात शौचालय बांधकाम करणाºया लाभार्थींना ३१ डिसेंबरपूर्वी अनुदान वाटप करणे तसेच २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणात शौचालय नसणाºया कुटुंबांना प्रोत्साहन अनुदान वाटप करण्याची अंतिम मुदत शासनाने निश्चित केली असून, तसा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केलेला आहे. पायाभूत सर्वेक्षणात असलेल्या तसेच पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या लाभार्थींनादेखील शौचालय बांधकाम केले असल्यास नियमानुसार प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या अनुदानापासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये तसेच अनुदानाचा लाभ दुबार मिळू नये यासाठी जिल्हा स्वच्छता मिशनतर्फे पडताळणी केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाला योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. ३१ डिसेंबरनंतर शौचालय बांधकामाचे अनुदान मिळणार नसल्याने, जिल्ह्यातील लाभार्थींची पडताळणी केली जात आहे. अनुदानातून काही कुटुंबे सुटले असतील तर आता अंतिम तपासणी ओडीएफ टप्पा २ पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी त्या, त्या गावात समित्या स्थापन केल्या असून, त्यामध्ये गावातील किमान ३ जणांचा समावेश आहे.  लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रत्येकी १००० रुपणे मानधन दिले जाणार   आहे. पडताळणीच्या या कामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :washimवाशिम