वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९६ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 10:42 AM2021-04-10T10:42:19+5:302021-04-10T10:42:40+5:30

Washim Corona Update : आणखी तिघांचा मृत्यू तर १९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

Three more killed in Washim district; 196 corona positive | वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९६ कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू; १९६ कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी तिघांचा मृत्यू तर १९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. आता एकूण रुग्णसंख्या १८ हजार २०० पोहचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार तिघांचा मृत्यू झाला तर १९६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. वाशिम शहरातील जिल्हा परिषद परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील ६, ड्रीमलँड सिटी येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ७, अल्लाडा प्लॉट येथील १, काळे फाईल येथील १, पोलीस वसाहत येथील २, काटीवेस येथील ३, देवपेठ येथील २, सुदर्शन नगर येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ७, राजस्थान आर्य कॉलेज जवळील १, मंगळवेस येथील १, निर्मल नगर येथील १, लाखाळा येथील २, प्रशासकीय इमारत परिसरातील ११, विनायक नगर येथील १, गणेशपेठ येथील १, पुसद नाका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, सोनखास येथील १, तामसाळा मोंटो कार्लो कॅम्प येथील १, तोंडगाव येथील १, सायखेडा येथील २, काटा येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, सावंगा येथील १, खंडाळा येथील १, अनसिंग येथील ५, उमराळा येथील ३, उकळीपेन येथील १, बोराळा येथील १, सोंडा येथील २, रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, व्यंकटेश नगर येथील १, गजानन नगर येथील २, गणेश नगर येथील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रिठद येथील २, मोरगव्हाण येथील २, गोहगाव येथील १, गणेशपूर येथील १, मालेगाव शहरातील गाडगे नगर येथील २, वार्ड क्र. ८ मधील ३, शहरातील इतर ठिकाणचे ८, कवरदरी येथील १, जांब येथील १, शिरपूर येथील २, सुकांडा येथील १, मेडशी येथील २, आमखेडा येथील १, मंगरूळपीर                      शहरातील सिध्देश्वर कॉलनी येथील ३, वार्ड क्र. १ मधील १, मोरया कॉलनी येथील १, अशोक नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ८, धानोरा येथील २, तऱ्हाळा येथील १, तांदळी येथील २, शेंदूरजना मोरे येथील २, वनोजा येथील ४, भूर येथील १, पेडगाव येथील १, चांदई येथील १, सोनखास येथील १, पिंप्री अवगण येथील १, कवठळ येथील २, पिंप्री येथील १, बालदेव येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील २, अरक येथील १, कळंबा येथील १, वरुड येथील १, धोत्रा येथील १, गिंभा येथील ३, नांदखेडा येथील १, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील ३, अजनी अजनी येथील १, रुई येथील ७, कारंजा शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, बंजारा कॉलनी येथील १, गणेश नगर येथील २, श्रीराम नगर येथील १, जागृती नगर येथील १, केदार नगर येथील १, शास्त्री चौक येथील १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहा येथील १, शिवनगर येथील १, पोहा येथील १, सोहळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Three more killed in Washim district; 196 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.