शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची वाशिम रेल्वे स्थानकावर तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 11:54 IST

Washim News खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेजारील जिल्हे तसेच परराज्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी होणे आवश्यक आहे. परंतु, येथील रेल्वे स्थानकावर ना तपासणी होते ना कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल पाहिला जातो. वेळीच खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्यात दाखल होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाने कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहे; परंतु वाशिम येथील रेल्वे स्थानकावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल किंवा तपासणी केली जात नाही. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तेव्हा रेल्वे सेवा बंद होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने अनलॉकच्या टप्प्यात रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. वाशिम मार्गे सध्या दोन रेल्वे धावतात. याशिवाय काही विशेष रेल्वेही धावतात. गत आठवड्यापासून परराज्यात तसेच शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासनाने परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मार्गदर्शक सूचना यापूर्वीच जारी केल्या आहेत. परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे अनिवार्य करण्यात आले; मात्र वाशिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल पाहण्यात येत नाही तसेच प्रवाशांची तपासणीही केली जात नाही. रेल्वे स्थानकात कोरोना टेस्टिंगची सुविधादेखील उपलब्ध नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने रेल्वे व बसस्थानक हे ‘कोरोनाचे वाहक’ ठरू नये, म्हणून आतापासूनच खबरदारी घेणे अपेक्षित आहे.

वाशिम रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची तपासणी करण्याची किंवा कोरोना टेस्टिंगची सुविधा उपलब्ध नाही.- एम. टी. उजवेरेल्वे स्टेशन मास्तर,  वाशिम

टॅग्स :washimवाशिमrailwayरेल्वे