शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा पारा चढला

By admin | Updated: May 18, 2015 01:36 IST

शनिवारपासून तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त.

वाशिम : ढगाळ वातावरणाने कमी झालेला तापमानाचा पारा शनिवारपासून पुन्हा वर सरकत आहे. तापत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यापासून उन्हाचा पारा वर सरकत आहे. मध्यंतरी ४२ अंश सेल्सिअसपेक्षा पार्‍याने उच्चांक गाठला होता. ११ मेपासून जिल्हय़ावर ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. शुक्रवारपर्यंत ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांची काही अंशी सुटका झाली होती; मात्र शनिवारपासून (दि.१६) पारा पुन्हा वर सरकल्याने, अंगाची काहिली करणार्‍या उष्णतेची दाहकता कमालीची वाढत आहे. दरम्यान, उष्माघाताशी दोन हात करण्यास जिल्हा सामान्य रुग्णालय सज्ज आहे. सलग दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. दिवसागणिक तापमानात विक्रमी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. परिणामी जिल्हावासीयांच्या अंगाची काहिली होत आहे. आग ओकणार्‍या सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत आहे. ताप येणो, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, भूकन लागणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, अस्वस्थता वाटणे, बेशुद्धावस्था येणे आदी उष्माघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून येताच, रुग्ण सावधगिरीचा उपाय म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांची गर्दी झाली होती. उष्माघाताने अद्याप एकही बळी घेतला नसला तरी धारण केलेला रुद्रावतार चिंतनीय असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. शनिवारपासून तापमान ४0 च्या वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो.