शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून वाल शेंगाचा यशस्वी प्रयोग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 17:33 IST

Agriculture News अनिकेत डिगांबर चौधरी यांनी या पद्धतीला फाटा देत सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून वाल शेंगाची लागवड केली.

लोकमत न्यूज नेटवर्क कोठारी: एरव्ही सोयाबीनमध्ये आंतर पीक म्हणून शेतकरी तुरीची लागवड करतात; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील युवा शेतकरी अनिकेत डिगांबर चौधरी यांनी या पद्धतीला फाटा देत सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून वाल शेंगाची लागवड केली. त्याचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला असून, आता या पिकातून दरवर्षी विक्रमी उत्पादन तो घेत आहे.मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील युवा शेतकरी अनिकेत डिगांबर चौधरी यांची चेहेल-कोठारी शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीत ते सोयाबीन, तूर, मुंग, उडिद ही पारंपरिक पिके घेत होते. तीन वर्षांपूर्वी बदल म्हणून त्यांनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तुरीऐवजी दीड एकर क्षेत्रात वाल शेंगाची लागवड केली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला. यात त्यांना सोयाबीनचे एकरी सहा क्विंटल उत्पादन होतेच शिवाय वाल शेंगांचेही विक्रमी उत्पादन होते. विशेष म्हणजे आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून वालाच्या शेंगा तोडणीस सुरुवात होते, तर सोयाबीनच्या काढणीनंतर त्यांना रब्बी हंगामातील हरभरा पिकाचीही पेरणीत त्यात करता येते. वालाच्या शेंगाचे उत्पादन साधारण मार्च महिन्यापर्यंत चांगले होते. बियाण्यांसाठी कवडीचाही खर्च नाही अनिकेत डिगांबर यांनी वाल शेंगाच्या पिकाची लागवड करण्यासाठी सुरुवातीला पारंपरिक गावराण बियाण्यांची प्रयोग म्हणून दोन तासात पेरणी केली होती. यातून त्यांना भरघोस उत्पादन झाल्यामुळे त्यांनी त्यातूनच बियाणे काढून पुढे या पिकाचे क्षेत्र वाढविले आणि दीड एकरात पेरणी सुरू ठेवली. त्यामुळे त्यांना बियाण्यांसाठी कवडीचाही खर्च येत नाही. यंदा मात्र वातावरण बदलामुळे अर्धा एकरातील वाल शेंगाचे पीक करपल्याने एकर भरातूनच त्यांचे उत्पादन सुरू आहे.  आठवड्याला १० क्विंटलची तोडणी अनिकेत चौधरी यांच्या शेतातील वालाचे पीक चांगलेच बहरदार असून, दर आठवड्याला ते १० ते १२ क्विंटल शेंगाची तोडणी करतात. त्या शेंगा ठोक पद्धतीने बाजारात विकतात. यवतमाळ, अमरावती, वणी, वर्धा, पुसद, अकोला या परजिल्ह्यांसह वाशिम व मंगरूळ पीर येथील बाजारातही ते शेंगांची विक्री करतात. सद्यस्थितीत त्यांना ठोक पद्धतीने केलेल्या विक्रीत ३० ते ३५ रुपये प्रती किलोचे दर मिळत आहेत.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी