शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार अर्थसहाय्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 14:14 IST

विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचे रहिवासी असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. ही योजना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणाºया विद्यार्थ्यांना लागू राहिल.

 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अथवा प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या व जिल्हा मुख्यालय क्षेत्राबाहेरील वास्तव्य असलेल्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले.
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक, त्याने ज्या राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. ही योजना जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणाºया विद्यार्थ्यांना लागू राहिल. तथापि, विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजेच वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ठिकाणी प्रवेश घेतल्यास तो विद्यार्थी वाशिम नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी नसावा. विद्यार्थी ११ वी, १२ वी व १२ वी नंतर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित असावा. ११ वी मध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यास १० वी मध्ये किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. तसेच पदवी, पदव्युत्तर शिक्षणाकरिता १२ वी मध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. १२ वी नंतर पदवी, पदविका तसेच पदवी नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. या अटी पूर्ण करणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे संपूर्ण कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाStudentविद्यार्थी