दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:04+5:302021-09-05T04:47:04+5:30

उत्पन्न दाखल्याकरिता सेतू सुविधा केंद्रावर अर्ज करावा लागतो, तेथून ऑनलाइन दाखले तयार केले जातात. त्यावर नायब तहसीलदार राठोड यांची ...

Students and parents suffer due to non-receipt of certificates | दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त

दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त

उत्पन्न दाखल्याकरिता सेतू सुविधा केंद्रावर अर्ज करावा लागतो, तेथून ऑनलाइन दाखले तयार केले जातात. त्यावर नायब तहसीलदार राठोड यांची डिजिटल सही केली जाते, त्याकरिता थंब लावावा लागतो. मात्र सॉफ्टवेअरमधे तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळे दाखले मिळत नाहीत. तांत्रिक अडचण दुरुस्ती करून दाखले उपलब्ध करावेत, अशी मागणी होत आहे.

सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याने दाखले मिळण्यास अडचणीचे जात आहे, लवकरच दुरुस्ती होऊन दाखले मिळतील.

- एम. जे. राठोड, नायब तहसीलदार,

१०वी - १२वीचा निकाल लागला आहे, मुलांना विविध शैक्षणिक कामांकरिता तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला आवश्यक असतो, गेल्या आठ दिवसांपासून पालक तहसील कार्यालय, सेतू केंद्रामधे चकरा मारत आहेत.

- गोपाल भोयर, पं.स. सदस्य

Web Title: Students and parents suffer due to non-receipt of certificates