शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरांकडून दगड फोडण्याचे काम

By admin | Updated: December 12, 2014 00:39 IST

वाशिम शहरातील चित्र : बालमजुरी कायदय़ाच्या नियमांचे उल्लंघन.

नंदकिशोर नारे / वाशिमशहरी व ग्रामीण भागातील बालमजुरीला आळा बसावा, यासाठी शासनाने १९८६ साली बालमजुरी कायद्याची स्थापना केली; मात्र या बालमजुरी कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे बालमजुरांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम शहरामध्ये अकोला नाका ते पाटणी चौककडे जाणार्‍या रस्त्यावर चक्क बालमजूर काम करताना दिसून येत आहेत.शासनाने १४ वर्षाच्या खालील मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये व त्याचे जीवन सुदृढ व्हावे, यासाठी त्यांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे पालन व्हावे, यासाठी शासनस्तरावर कठोर नियम केले आहेत; मात्र या कायद्याने ठरवून दिलेल्या आदेशाची योग्य त्या प्रमाणात अंमलबजावणी होत नसल्याने आजही हॉटेल्स, वीटभट्टी, मोटारसायकल दुरुस्तीची कामे, घरगुती कामाकरिता बालमजुरांचा राजरोसपणे वापर होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. शासनाच्या नियमानुसार समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेऊन याविषयी तक्रार दिल्यास बालकामगार ठेवणार्‍या व्यक्तींवर कारवाई करता येते; मात्र स्थानिक पातळीवर यासाठी कुणी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे याप्रकरणी कायद्याच्या चाकोरीत राहून कारवाई करणे कठीण बाब असते; मात्र या कायद्याबाबत शासन स्तरावरील वरिष्ठ अधिकार्‍यांनी जाणिवजागृती करुन या कायद्याबाबत विविध सामाजिक उपक्रमातून माहिती दिल्यास बालमजुरीला काही प्रमाणात आळा बसू शकतो; परंतु याबाबत जिल्ह्यात जाणिवजागृतीचा मोठा अभाव असल्याने बालमजुरी प्रतिबंधक कायद्याचे ज्ञान तळागाळा तील लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. याचाच फायदा घेत काही कंत्राटदार बालमजूर कमी पैशामध्ये मिळतात म्हणून त्यांचा वापर करताना दिसून येत आहेत, तर रोजगाराशिवाय उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न समोर येत असल्याने बालकामगार वाटेल ते काम करीत आहे. वाशिम शहरातील भररस्त्यावर बालकामगार दगड फोडत असताना एकाही सामाजिक संघटनेचे म्हणा किंवा संबंधित विभागाचे याकडे लक्ष अद्याप गेलेले दिसून येत नाही. बालमजुराविषयी कायद्याचे ज्ञान सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. याकडे प्रशासनाचे सपसेल दुर्लक्ष होत चालले असल्याचे चित्र आहे.