शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेची हत्या करणा-यास सात वर्षांचा कारावास

By admin | Updated: December 12, 2014 00:52 IST

वाशिम जिल्ह्यातील कोंडाळा झामरे येथील घटना.

वाशिम : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बेवारस सापडलेल्या तीन वर्षीय निष्पाप बालिकेची भिंतीवर व जमिनीवर आपटून हत्या करणार्‍या लक्ष्मण पांडुरंग शिंदे (रा. कोंडाळा झामरे) या आरोपीस सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा. सिकची यांनी आज (दि. ११) सुनावली. घटना कोंडाळा झामरे येथे ४ नोव्हेंबर २0१३ रोजी घडली होती.आरोपी लक्ष्मण शिंदे यास दारुचे व्यसन होते. ४ नोव्हेंबर २0१३ रोजी रात्री ९ ते ९.३0 च्या दरम्यान आरोपी पती लक्ष्मण याने आ पल्यासोबत वाद घालून सोनी नावाच्या तीन वर्षीय बालिकेच्या गालात चापट व बुक्क्यांनी मारहाण करुन भिंतीवर व जमिनीवर तिला आदळले व तिला खांद्यावर उचलून रेल्वेगेटकडे घेऊन गेला व तिचे काहीतरी बरेवाईट करेल, अशी फिर्याद कविता लक्ष्मण शिंदे हिने वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. आरोपी लक्ष्मण हा रेल्वेने अकोलाकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणेदार आव्हाळे यांनी विनाविलंब अकोला रेल्वे स्टेशनला पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत सोनी नव्हती. चौकशी केली असता पंचासमक्ष आरोपीने सोनी हिला जिवाने मारुन तिचे प्रेत मुठाळ यांच्या शेताशेजारी नाल्याच्या काठावर चिखलात गाडून टाकल्याची कबुली दिली. त पासानंतर आरोपीविरुद्ध कलम ३0२, २0१ भादंविनुसार विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा. सिकची यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी लिना यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार मृतक सोनी हिच्या मृत्यूबाबत निश्‍चित कारण न्यायालयासमोर आले नाही; मात्र आरोपीने मृत्यूबाबत न्यायालयासमोर कसलेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे न्यायाधिश यांनी सदरचे पुरावे व परिस्थितीजन्य पुरावे, आरोपीचा कबुली जबाब, तसेच आरोपीचा फरार होण्याचा मानस यावरुन कलम ३0४ भाग २ तसेच कलम २0१ भादंविनुसार आरोपी लक्ष्मण शिंदे यास प्रत्येकी सात वर्षाचा सश्रम कारावास व शंभर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता अँड. अरुण सरनाईक यांनी बाजू मांडली.