विवाहितेच्या छळप्रकरणी सात जणांवर गुन्हा

By Admin | Updated: October 3, 2015 02:35 IST2015-10-03T02:35:05+5:302015-10-03T02:35:05+5:30

मानोरा तालुक्यातील घटना.

Seven accused in the marriage racket | विवाहितेच्या छळप्रकरणी सात जणांवर गुन्हा

विवाहितेच्या छळप्रकरणी सात जणांवर गुन्हा

मानोरा (जि. वाशिम): तालुक्यातील आसोला खु. येथील विवाहित महिलेच्या छळप्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये सात जणांवर १ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसोला खु. येथील विवाहित महिला आस्मिता कपिल पवार (२२) हिने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की फि र्यादी महिलेचे आसोला खु. येथे समाजाच्या रितीरिवाजानुसार एक वर्षांंपूर्वी लग्न झाले. फिर्यादीचे माहेर मानोरा तालुक्यातील गिरडा आहे. माहेरून एक लाख रुपये आणण्याची मागणी करीत सासरच्या मंडळीने फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला. या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी फिर्यादीचा पती कपिल केशव पवार, सासरा केशव पवार, सासू रुख्मा केशव पवार, वडगाव येथील विजय नारायण राठोड, आशिष विजय राठोड, तसेच इतर दोघांसह सात जणांविरुद्ध कलम ४९८ अ, २३२, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मानोरा पोलीस करीत असून, वृत्त लिहिपर्यंत आरोपींना अटक झाली नव्हती.

Web Title: Seven accused in the marriage racket