शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांनाही मिळणार नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:28+5:302021-09-03T04:44:28+5:30

वाशिम : जल जीवन मिशनअंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या बाधित निधीमधून पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करून ...

Schools, Anganwadis, health sub-centers will also get plumbing | शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांनाही मिळणार नळजोडणी

शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रांनाही मिळणार नळजोडणी

वाशिम : जल जीवन मिशनअंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या बाधित निधीमधून पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करून घरगुती नळ जोडणीसोबतच गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र यांना नळजोडणी देण्याचे निर्देश ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिले.

जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात याबाबत तालुकानिहाय बैठकांचे आयोजन २ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. मंगरुळपीर तालुक्याचा आढावा साळुंखे यांनी घेतला. यावेळी पंचायत सिमतीचे विस्तार अधिकारी आर. के. राऊत, बेलखेडकर यांची उपस्थिती होती.

०००

नळ जोडणीची कामे पूर्ण करा

पुढील सोमवारपर्यंत नळ जोडणीची कामे पूर्ण करून याबाबत ऑनलाइन प्रणालीवर माहिती भरण्याचे निर्देश ग्रामसेवकांना देण्यात आले. बैठकीला तालुक्यातील ग्रामसेवक, पाणी पुरवठा उपविभागाचे सर्व अभियंता यांची उपिस्थती होती. पुढील सोमवारी, ६ सप्टेंबर रोजी मानोरा व कारंजा तालुक्याची बैठक घेण्यात येणार आहे.

Web Title: Schools, Anganwadis, health sub-centers will also get plumbing