शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणा-या सरपंचपतीचे प्रकरण न्यायालयात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:22 IST

वाशिम : उघड्यावर शौचास जाणाºया मालेगाव तालुक्यातील वडप या गावातील रमेश दगडुजी चंदनशिव या सरपंचपतीच्या न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. ११ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील न्यायालयात तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांची साक्ष झाली असुन पुढील सुनावणी १६ सप्टेबर रोजी होणार आहे.

ठळक मुद्देउपमुख्य कार्यकारी अधिका-यांची साक्ष  हुज्जत घातल्याने केली होती कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उघड्यावर शौचास जाणाºया मालेगाव तालुक्यातील वडप या गावातील रमेश दगडुजी चंदनशिव या सरपंचपतीच्या न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. ११ सप्टेंबर रोजी मालेगाव येथील न्यायालयात तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांची साक्ष झाली असुन पुढील सुनावणी १६ सप्टेबर रोजी होणार आहे.स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत तालुका व जिल्हा पातळीवर गुड मॉर्निंग पथके स्थापन करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुखदेखील या पथकात सहभागी होऊन लोटाबहाद्दरांविरूद्ध कारवाई करतात. अशाच एका कारवाईत २९ डिसेंबर २०१६ रोजी वडप येथील रमेश दगडुजी चंदनशिव यांना पथकातील अधिकाºयांनी पकडले असता, त्यांनी पथकातील सदस्यांसोबत हुज्जत घातली. पथक प्रमुख तथा बहिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्याशी चर्चा करुन २ जानेवारी २०१७ रोजी मालेगाव पोलीस स्टेशनला लेखी तक्रार केली. या तक्रारीवर जवादे यांच्यासह  मालेगाव तालुक्याच्या समन्वयक पुष्पलता अफुणे, विस्तार अधिकारी बापुराव ठाकरे आणि वाहन चालक सुरेश वानखेडे यांच्या स्वाक्षरी आहे. यावरुन मालेगाव पोलिसांनी भादंवी कलम ३५३ व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला होता.  सध्या हे प्रकरण मालेगाव येथील न्यायालयत सुरु असुन याबाबत ११ सप्टेंबरला वरिष्ठ अधिकाºयांची साक्ष घेण्यात आली. पुढील सुनावणी १६ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून, न्यायालयाच्या निकालाकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सरकारी वकील रतनवरे हे या प्रकरणाची बाजु मांडत आहेत तर प्रतिपक्षाच्या वतीने अ‍ॅड. मगर हे काम पाहत आहेत.