शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण मोहिमेत रिसोड तालुका आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

जिल्ह्यातील १३ लाख, ७४ हजार ७३५ लोकसंख्येपैकी १० लाख १३ हजार १८० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निर्धारित ...

जिल्ह्यातील १३ लाख, ७४ हजार ७३५ लोकसंख्येपैकी १० लाख १३ हजार १८० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाभरात १५६ केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर वेळोवेळी आवश्यक प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात असून, १८ ते ४५, ४६ ते ५९ आणि ६० वर्षे वयावरील सर्वच व्यक्तींना मोफत लस दिली जात आहे. यात २४ जुलैपर्यंत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील १ लाख १६ हजार ३०० लोकांनी, ४६ ते ५९ वयोगटातील १ लाख ५६ हजार ६९८, तर ६० वर्षे व त्यावरील वयोगटाच्या १ लाख ४० हजार ७५५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. अर्थात २४ जुलैपर्यंत ९ लाख २१ हजार ४८४ नागरिकांनी लसच घेतली नव्हती. त्यातही तालुक्याचा विचार करता रिसोड तालुक्याने ५४.५० टक्क्यांसह लसीकरणात आघाडी घेतली. त्या खालोखाल वाशिम ५१.२३ टक्के, कारंजा ४९.९८ टक्के, मंगरूळपीर ४६.८६ टक्के, मानोरा ३०.५७ टक्के आणि मालेगाव २९.३४ टक्के असा क्रमांक येतो.

--------------

स्वयंसेवी संघटनांचे कार्य प्रशंसनीय

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी खासगी आणि स्वयंसेवी संघटनांनीही पुढाकार घेतला. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यास मदत झाली. त्यात रिसोड तालुक्यात शंभर टक्के लसीकरण करण्याचे ध्येय समता फाउंडेशन या संघटनेने निश्चित केले होते. या संघटनेने स्वत: पुढाकार घेऊन रिसोड तालुक्यात जवळपास ३० हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सहकार्य केले.

--------------

मालेगाव तालुक्याचे प्रमाण सर्वात कमी

जिल्ह्यात निर्धारित लसीकरण उद्दिष्टापैकी ४५ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यात रिसोड तालुका आघाडीवर असताना मालेगाव तालुक्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. मालेगाव तालुक्यात १,७२,६०५ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असताना ५०,६५४ नागरिकांनीच लस घेतली आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या २९.३४ टक्के आहे. अर्थात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात या तालुक्यातील नागरिक उदासीन असल्याचे दिसते.

-----------

तिसरी लाट ओसरल्याचा परिणाम

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट जवळपास पूर्णपणे ओसरली आहे. जिल्हाभरात आता केवळ ५३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यातही रविवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार दोनच तालुक्यात केवळ ४ जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यात मालेगाव तालुक्यात १ आणि रिसोड तालुक्यातील २ व्यक्तींचा समावेश होता. कोरोना संसर्गाच्या घटलेल्या प्रमाणामुळे नागरिकांना लसीकरणाकडे पाठ केल्याचे दिसत आहे.

-------

कोट: जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील गावागावात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रावर पुरेशा लसीही उपलब्ध आहेत. तथापि, काही तालुक्यात लसीकरणासाठी अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.

-डॉ. मधुकर राठोड.

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

----------------

जिल्ह्याची लोकसंख्या - १३,७४,७३५

जिल्ह्याचे उद्दिष्ट- १०,१३,१८०

झालेले लसीकरण-४.५३,२५१

----------

वाशिम तालुका

लसीकरण उद्दिष्ट - २,११,१०३

झालेले लसीकरण- १,०८,१६७

---------------

कारंजा तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,७६,८७४

झालेले लसीकरण- ८८,४०८

----------

मं.पीर तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,४४,९४०

झालेले लसीकरण- ६७,९२४

-----------

रिसोड तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,७१,६९१

झालेले लसीकरण- ९३,५६३

----------

मालेगाव तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,७२,६०५

झालेले लसीकरण- ५०,६५४

----------

मानोरा तालुका

लसीकरण उद्दिष्ट - १,३५,८६८

झालेले लसीकरण- ४१,५३५