सांडपाण्यामुळे आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST2021-09-07T04:50:34+5:302021-09-07T04:50:34+5:30

-- जोडरस्त्याची उंची कमी-अधिक वाशिम: मालेगाव-रिसोड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना कंत्राटदारांनी खेडेगावच्या मार्गाला या मार्गाशी जोडण्यासाठी ...

Risk to health due to sewage | सांडपाण्यामुळे आरोग्याला धोका

सांडपाण्यामुळे आरोग्याला धोका

--

जोडरस्त्याची उंची कमी-अधिक

वाशिम: मालेगाव-रिसोड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना कंत्राटदारांनी खेडेगावच्या मार्गाला या मार्गाशी जोडण्यासाठी डांबरीकरण केले; परंतु त्याची पातळी महामार्गाशी जोडल्या गेली नाही. त्यामुळे चालकांना अडचणी येत आहेत.

-----

पाणीपुरवठा विस्कळीत

वाशिम: तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी जलस्वराज योजनेच्या पंपाची वीजजोडणी कृषी फिडरवर करण्यात आली आहे. त्यात गेल्या चार महिन्यांपासून विविध कारणांमुळे या फिडरवरचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा ठप्प होत आहे.

------------

उमेद अंतर्गत महिलांची सभा

वाशिम : तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी उमेद स्वयंसहायता समूहच्या महिलांची सभा घेण्यात आली. प्रामुख्याने सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकरी महिलांचा गटात सहभाग असून, या महिलांना दशपर्णी अर्क तयार करणे, जिवामृत तयार करणे व वापर, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Risk to health due to sewage