शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने बळीराजाला दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:35 IST

वाशिम: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) लवकरच परतीचा मार्ग धरणार असताना सोमवारी जिल्ह्यात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मानोरा तालुका वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी मिळून १0५ मिमी पावसाची नोंद झाली. 

ठळक मुद्देजिल्ह्यात १0५ मिमी पाऊसतूर, कपाशीला आधार 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) लवकरच परतीचा मार्ग धरणार असताना सोमवारी जिल्ह्यात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मानोरा तालुका वगळता जिल्ह्यात सर्व ठिकाणी मिळून १0५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात यंदा गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिके  संकटात सापडली आहेत. यंदा ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून, त्यामध्ये पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीन, तर ५३ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे, तर ३0 हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे. त्याशिवाय मूग, उडीद आणि ज्वारीच्या पिकाचाही बर्‍यापैकी पेरा यंदा करण्यात आला आहे. तथापि,  यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांना मोठा फटका बसला असून, उडीद आणि मुगाच्या उत्पादनात घट आल्यानंतर सोयाबीनचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात घटण्याची भीती निर्माण झाली. त्यातच दीर्घ कालावधीची पिके  असलेली तूर आणि कपाशी पूर्णपणे बुडण्याचीच भीती असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. अशात सोमवारी दुपारपासून जिल्ह्यातील मानोरा तालुका वगळता पावसाने सर्वच तालुक्यात हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड या तीन तालुक्यात हा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात याच दिवशी १0५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे पिकांना विशेष करून शेंगावर असलेले हिरव्या सोयाबीनसह तूर आणि कपाशीच्या पिकाला मोठा आधार मिळाला आहे. परतीच्या मार्गावर असलेल्या पावसाच्या आगमनामुळे शेतकर्‍यांची चिंता थोडीफार दूर झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात होता; मात्र पाऊस पडला नाही.

मानोरा तालुका कोरडाच!सोमवारी सायंक ाळपासून वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी, मानोरा तालुक्यात मात्र पावसाचा एकही थेंब पडला नाही. या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात, तूर कपाशी आणि सोयाबीनची पेरणी झालेली असून, ही पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत. सोयाबीन, तर पूर्णपणे हातून गेल्यात जमा आहे. दरम्यान, मालेगाव तालुक्यातही केवळ ३ मिमी पावसाची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. 

सरासरीच्या तुलनेत प्रमाण कमीच!सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३७ मिमी पाऊस रिसोड तालुक्यात, त्या खालोखाल ३५ मिमी कारंजा तालुक्यात, मंगरुळपीर तालुक्यात २0 मिमी आणि वाशिम तालुक्यात १0 मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, या पावसानंतरही १ जून ते ११ सप्टेंबरपर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात केवळ ६४.९९ टक्केच पाऊस पडला असून, प्रकल्पातील पाणी पातळीवर या पावसाचा काहीच परिणाम झालेला नाही.