शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ- भाजपा उमेदवारात थेट लढत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 20:04 IST

जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात थेट लढत होत आहे. १४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 

ठळक मुद्दे जिल्हा नियोजन समिती निवडणूक १४ सप्टेंबर रोजी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारात थेट लढत होत आहे. १४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होत असून एकंदरित १०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनु. जाती स्त्री प्रवर्गाचा अपवाद वगळता उर्वरीत दोन्ही प्रवर्गातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन उमेदवारांची अविरोध निवड झाली. अनु.जाती स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या करूणा कल्ले (वाशिम) व राकाँच्या संघमित्रा पाटील (मंगरूळपीर) यांच्यात आता सरळ लढत होत आहे. याच प्रवर्गातील वर्षा इंगोले (कारंजा) व प्रतिभा सोनोने (कारंजा) यांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची तर सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून ज्योती लवटे (मंगरूळपीर) यांची अविरोध निवड झालेली. एका जागेसाठी भाजपा व राकाँ आमनेसामने उभे ठाकले असून, यामध्ये कोण बाजी मारतो, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. १० महिन्यांपूर्वी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा येथे नगर परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारीप-बमसं, भाजपाचे संख्याबळ बºयापैकी असून, राकाँला मंगरूळपीरचा अपवाद वगळता वाशिम व कारंजा येथे फारसे यश मिळाले नाही. या निवडणुकीत काँग्रेस, भारिप-बमसं व शिवसेनेचे मतदार कोणती भूमिका घेतात यावर राकाँ व भाजपाच्या उमेदवाराच्या यशापयश अवलंबून आहे.