वाशिम जिल्हयात सर्वत्र पाऊस

By Admin | Updated: August 21, 2014 00:29 IST2014-08-20T23:09:34+5:302014-08-21T00:29:30+5:30

१५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी पहाटे ७.१५ वाजता अचानक हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला.

Rainfall everywhere in Washim district | वाशिम जिल्हयात सर्वत्र पाऊस

वाशिम जिल्हयात सर्वत्र पाऊस

वाशिम : मागील १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी पहाटे ७.१५ वाजता अचानक हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा सुखावला. वाशिम शहर परिसरात सुमारे तास भर पाऊस पडला. कारंजा वगळता जिल्हयात सर्वत्र पाऊस झाला. सरासरी ४५.३0 मि.मि. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर आतापर्यंत दरवर्षीच्या तुलनेत सुमारे ५0 टक्के पाऊस कमी झाला आहे. पावसाअभावी पिके सुकून चालली होती. अचानकपणे बुधवारी सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंद होता. वाशिम येथे १८ मि.मि.पाऊस पडला. मालेगाव येथे १ मि.मि., रिसोड येथे ८ मि.मि., मंगरुळपीर येथे १६.३0 मि.मि. व मानोरा येथे २.मि.मि.पाऊस झाल्याची नोंद आहे. तर कारंजा कडै पावसाने पाठ फिरविली आहे. अचानकपणे पाऊस कोसळल्याने दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान कमी होवून हवामानात गारवा आला होता. यावर्षी जिल्हयामध्ये आतापर्यंत वाशिम तालुक्यात २८९.८0 मि.मि., मालेगाव २८७.६0 मि.मि., रिसोड २१७ मि.मि., मंगरुळपीर २९५.९0 मि.मि., मानोरा २५७.५0 मि.मि., तर कारंजा ३५६ मि.मि.असा जिल्हयात एकूण १७0३.८0 मि.मि., पाऊस झाला आहे. एकूण सरासरी २८३.९७ मि.मि.पाऊस जिल्हयात झाला आहे. असून मागील वर्षीच्या तुलनेत फक्त ५१ टक्केच पाऊस जिल्हयात झाला आहे. यामुळे आगामी दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास जिल्हयातील शेतकर्‍यांना मोठया संकटास सामोरे जावे लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

Web Title: Rainfall everywhere in Washim district