शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३६३ शाळांसमोर सॅनिटायझर खरेदीचा प्रश्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 07:00 IST

wASHIM NEWS : खासगी अनुदानित शाळांकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना कोरोनामुळे शाळा बंद  ठेवण्यात आलेल्या राज्यातील ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा  २३ नोव्हेंबरपासून नियमित सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. तथापि, यासाठी तयार केलेल्या अर्थात मार्गदर्शक सुचनानुसार शिक्षकांच्या कोरोना चाचणीसह शाळांत सॅनिटायझर आणि थर्मल गन ठेवणे बंधनकारक आहे. शासकीय शाळांना शासनाकडून यासाठी निधी मिळणार असला तरी, खाजगी अनुदानित शाळांची मात्र पंचायत झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील ३६३ अनुदानित शाळांसमोर  सॅनिटायझर आणि थर्मल गनच्या खरेदीचा प्रश्न उभा आहे. 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत राज्यातील सर्व शाळा येत्या काळात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, शालेय शिक्षण विभागाने मागील चार दिवसांपूर्वी शासन निर्णय जारी केला असून, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आणि शाळा सुरू केल्या जाणार आहेत.  या आदेशानुसार, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ नोव्हेंबरपासून कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.  मात्र ही चाचणी करण्यासाठी येणारा खर्च विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना परवडणारा नाही,  याचबरोबर शाळांमध्ये थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटरसह  शाळा सुरू करण्यापूर्वी  निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी खासगी अनुदानित शाळांकडे आवश्यक निधी उपलब्ध नाही.  

   शासनाचा शाळा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. तथापि, यासाठी घालून दिलेल्या निर्देशानुसार शाळेत सॅनिटायझर, थर्मल गन किंवा ऑक्सीमिटर खरेदीसाठी आमच्याकडे पुरेसा निधी नाही. शासनाने यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद करावी.     - प्राचार्य संजिवनी पाथ्रीकर, य.च. विघालय मंगरुळपीर

 जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची तयारी आहे. शासन निर्देशानुसार खाजगी अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदानातून सॅनिटायझर, थर्मल गन, ऑक्सीमिटर खरेदी करावे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निर्जंतुकीकरण करून घ्यावे.-अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी, जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा