शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंग उपबाजारात सोयाबीनची हमीपेक्षा कमी दराने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 17:03 IST

२८०० रुपये ते ३३५५ रुपये प्रति क्विंटल दराने अर्थात हमीदरापेक्षा ३५० रुपयांहून कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम): वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या अनसिंग येथील उपबाजारात सोयाबीनची बेभाव खरेदी व्यापाºयांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात वाशिम बाजार समितीसह इतर सर्वच बाजार समित्यांत सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक दर मिळत असताना अनसिंग येथील उपबाजारात चांगल दर्जाच्या सोयाबीनची अवघ्या २८०० रुपये ते ३३५५ रुपये प्रति क्विंटल दराने अर्थात हमीदरापेक्षा ३५० रुपयांहून कमी दराने खरेदी करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत आलेल्या अवकाळी पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यात काढणी केलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले. बाजारात गेल्या महिनाभरापासून नव्या सोयाबीनची खरेदीही सुरू झाली आहे. सुरुवातीला नव्या सोयाबीनची खरेदी ३४०० ते ३५०० रुपये दराने हो असली तरी आता मात्र सोयाबीनला चांगले दर मिळू लागले आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांत सोयाबीनची ३७०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दराने खरेदी होत आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला तथापि, वाशिम बाजार समितीचा उपबाजार असलेल्या अनसिंग येथील बाजार समितीत मात्र सोयाबीनची कवडीमोल दराने खरेदी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला किमान २८०० रुपये ते ३३५५ रुपये प्रति क्विंटलचे दर दिले जात आहेत. शासनाने यंदा सोयाबीनला ३७१० रुपये प्रति क्विंटलचे दर घोषीत केले असताना अनसिंग उपबाजारात ३५० रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकºयांची पिळवणूक होत आहे. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी हस्तक्षेप करून शेतकºयांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी