महापारेषणच्या कंत्राटी कामगारांना कमी केल्याच्या निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:41 IST2021-09-11T04:41:57+5:302021-09-11T04:41:57+5:30

महापारेषण कंपनीत तांत्रिक तृतीय व चतुर्थ श्रेणीमध्ये कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. हे कंत्राटी कामगार हा नियमित कामगारांच्या ...

Protest against reduction of contract workers of Mahatrans | महापारेषणच्या कंत्राटी कामगारांना कमी केल्याच्या निषेध

महापारेषणच्या कंत्राटी कामगारांना कमी केल्याच्या निषेध

महापारेषण कंपनीत तांत्रिक तृतीय व चतुर्थ श्रेणीमध्ये कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. हे कंत्राटी कामगार हा नियमित कामगारांच्या टक्केवारी नुसार कार्यरत आहेत. मोठ्या जबाबदारीची कामे व्यवस्थित व निष्ठेने पार पाडण्याचे काम सदर कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे करीत आहे. महापारेषण कार्यालयीन आदेशानुसार कंपनीमध्ये सुधारित मनुष्यबळ पुनर्रचनेनुसार अंमलबजावणी करीत असताना कोणताही कर्मचारी कमी होणार नाही त्यांची काळजी घेणे अपेक्षित होते. परंतु मनुष्यबळ पुनर्रचना लागू होताना मोठ्या प्रमाणात तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांची संख्या कमी होत आहे. नियमित कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे कंत्राटी कामगारांचा रोजगार हिरावून जाऊन त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. हा प्रकार हा निंदनीय आहे. नागपूर व इतर परिमंडळातील कंत्राटी कामगारांना कमी करण्याचे दिलेले आदेश त्वरित मागे घ्यावे. अन्यथा दिलेल्या अन्यायकारक आदेशाविरुद्ध संघटना या नंतर प्रकाश गंगा-मुंबई येथे तीव्र आंदोलन करणार असल्याची घोषणा तांत्रिक ऑप्रेंटीस कंत्राटी कामगार असोसिशनचे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी केली.

Web Title: Protest against reduction of contract workers of Mahatrans